निलंगा : तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान वादळी वा-यासह अवकाळी पाऊस पडला . या वादळी वा-याने हालसी ते तगरखेडा जाणा-या रस्त्याच्या बाजूचे झाड रस्त्यावर पडल्याने थोडावेळ वाहतूक बंद झाली . दरम्यान ग्रामस्थांनी पडलेले झाड रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली आहे. तसेच तगरखेडा येथील मेन लाईनचे वायर तुटल्याने वीज पुरवटा खंडित झाला आहे . तसेच तगरखेडा येथे शेतातील सौर उर्जा उखडून पडल्याने शेतक-याचे नुकसान झाले आहे. ं
खाजगी तथा शासकीय वेधशाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार निलंगा तालुक्यातील औराद शहाजानीसह परिसरात सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान सोसाट्याच्या वा-यासह पावसास सुरुवात झाली. पावसादरम्यान वारा दिशा बदलत वाहत होता. या अवकाळी पावसामुळे शेतक-याच्या फळबागांचे नुकसान, तथा उन्हाळी सोयाबीन हातातोंडाशी आलेले भीजल्याने शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच तगरखेडा-हालसी(तुगाव) तालुका निलंगा दरम्यान रस्त्याच्या कडेचे झाडे उन्मळून रस्त्यावर पडल्याने वाहतूक काही
काळासाठी बंद झाली होती. प्रवासी व ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील झाड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे.दरम्यान तगरखेडा येथील विजयकुमार शिवाजी पाटील यांच्या शेतातील सौरउर्जा उखडून पडल्याने नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या विषयी तहसीलदार गणेश जाधव यांच्याशी विचारणा केली असता मोठ्या नुकसानीची
अद्याप काहीही माहिती मिळाली नसल्याचे सांगितले.