25.2 C
Latur
Sunday, November 27, 2022
Homeलातूरलातूर शहरातील शाळांचे दहावीमध्ये घवघवीत यश

लातूर शहरातील शाळांचे दहावीमध्ये घवघवीत यश

एकमत ऑनलाईन

लातूर :मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत लातूर शहरातील विद्यालयानी  उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखली आहे.

‘श्री देशिकेंद्र’ च्या २२ विद्यार्थ्यांना १००% गुण
मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत विद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखत आतापर्यंतच्या निकालाचा रेकॉर्ड कायम ठेवला असून यावर्षी १००टक्के गुण मिळविणारे २२ विद्यार्थी, ९० टक्केच्या पुढील एकूण ३१५ विद्यार्थी असून विद्यालयाचा निकाल ९९.६३ टक्के लागला आहे.

यावर्षी एकूण ८३० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी ८२८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक सुहासिनी कल्याणी, उपमुख्याध्यापक सुरेश नस्के, पर्यवेक्षक उमेश गिरवलकर, विजय महाजन, रामलिंग मुळे, जयश्री ठवळे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

पालकमंत्री अमित देशमुख यांच्याकडून अभिनंदन
लातूर : दहावीच्या परीक्षेतील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी अभिनंदन करुन त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.


‘परिमल’च्या १३८ विद्यार्र्थ्यांनी पटकावले ९० टक्केपेक्षा अधिक गुण
येथील नारायणनगरमधील परिमल माध्यमिक विद्यालयाचा दहावी परीक्षेचा निकाल ९९़ ७५ टक्के लागला असून विशाखा सुधीर भोसले हिने १०० टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला तर १३८ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेतले आहेत.

साक्षी संजय निरगुडे या विद्यार्थिनींने ९९़८८ टक्के गुण घेऊन विद्यालयात द्वितीय आली आहे़ १० विद्यार्थ्यांनी ९९ टक्क्यांपेक्षा अधिक, ५५ विद्यार्थ्यांनी ९५ टक्क्यापेक्षा अधिक गुण घेतले तर विशेष प्राविण्यासह ८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था सचिव बाबूराव जाधव, प्राचार्य श्रीनिवास जाधव, पर्यवेक्षक कदम, शेळके, सर्व
शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले़

राजमाता जिजामाता विद्यालयाचा दहावीचा निकाल ९८ टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेत येथील राजमाता जिजामाता विद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत या विद्यालयाचा निकाल ९८ टक्के लागला आहे.
विद्यालयातून रोहिणी संदीपान डाके ही ९५.४० टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम आली आहे. अश्­िवनी गोविंद बिरादार ही ९५ टक्के गुण घेऊन द्वितीय तर अजय तुळशीदास टाक याने ९३.४० टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. तर ९० टक्केपेक्षा जास्त गुण घेतलेले एकूण ११ विद्यार्थी आहेत. प्रणिता बालाजी मोरे ९२.६० टक्के गुण, नरहरी बलभीम चव्हाण ९२.२० टक्के गुण, श्रृती विश्­वनाथ पोलकर ९२.२० टक्के गुण, विष्णू गणपती आराध्ये ९१.६० टक्के गुण, प्रज्वल प्रविण रामगिरे ९१.६० टक्के गुण, चिन्मय चारुदत्त जोशी ९०.२० टक्के गुण, गौरव अच्युत पाथरकर ९०.२० टक्के गुण, कु. वैष्णवी मारोती पिंगळे ९० टक्के गुण ३८ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून ७३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

या गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षक आमदार विक्रम काळे, एस. एस. सी. बोर्डाचे चेअरमन व्ही. के. खांडके, शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती के. ए. जायेभाये, प्राचार्य डी. एन. केंद्रे, प्राचार्य संगमेश्­वर केंद्रे, समन्वयक स्वाती केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, विधी सल्लागार राणी केंद्रे, आर. डी. बिरादार, अशोक पवार, सुनिता जवळे, शोभा कांबळे, पांडूरंग कुलकर्णी, सत्यवान देशपांडे, मदन धुमाळ, परमेश्­वर गित्ते, शिवकांत वाडीकर यांनी अभिनंदन केले.

ज्ञानेश्वर विद्यालयाचे घवघवीत यश
मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या शालान्त प्रमाणपत्र परीक्षेत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय, लातूर या शाळेने यशाची परंपरा कायम राखली असून विद्यालयातून २ विद्यार्थी १०० टक्के गुण घेऊन तसेच ७० विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयाचा निकाल ९९.३६ टक्के इतका लागला असून या विद्यालयातून शिंगडे तन्मय कमलाकर व कु.शिंगडे सृष्टी परमेश्वर हे दोन विद्यार्थी १०० टक्के गुण घेऊन प्रथम आले आहेत़ तर प्रीती सुधाकर कुरील व श्रद्धा सुधाकर शिंगडे या दोघी ९९.६० टक्के गुण घेऊन विद्यालयातून तृतीय आल्या आहेत.

या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड़ मनोहरराव गोमारे साहेब, उपाध्यक्ष डी़ जी़ शेळके, सचिव डी़ एऩ शेळके, कोषाध्यक्ष प्रा़ नागनाथराव कनामे, सहसचिव प्रल्हादराव दुडिले, प्रा़ प्रकाशराव शिंगडे तसेच संस्थेचे सर्व संचालक व
मुख्याध्यापक चेरेकर एस़ एस़, उप मु़अ़वाघमारे एस़ एम़, परीक्षा प्रमुख बैनगिरे एच़ एस़ तसेच सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचा-यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.

डॉ़ महंमद इकबाल उर्दु स्कूलचे यश
दहावीच्या परीक्षेत येथील डॉ़ महंमद इकबाल उर्दु गर्ल्स हायस्कूलचा निकाल ९६़८७ टक्के लागला आहे़ या विद्यालयातून ११० विद्यार्थिनी परिक्षेस बसले होते़ त्यापैकी विशेष प्राविण्यासह १८, प्रथम श्रेणीत ३९, द्वितीय श्रेणीत ३० विद्यार्थिंनी उत्तीर्ण झाल्या आहेत़ सफुरा चौधरी रिसालत सय्यद, सादीया पठाण, सायमा शेख, रुखैय्या सिद्दिकी, सफिहा सय्यद, महिदा सय्यद, इफरा कादरी, जवेरिया पठाण, असफिया पठाण, जिकरिया पठाण, शफिया रुमान, शिफा कुरेशी, आसमा शेख, महिदा पटेल या विद्यार्थिनींनी यश संपादन केले़ यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थाध्यक्ष मिन्हाजोद्दिन सय्यद, संस्थापिका सुलताना काजी, सचिव अशरफखा पठाण, प्राचार्या शाहीन पठाण, सर्व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे.

गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयाचे यश
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत येथील श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयाने यंदाही आपली यशाची परंपरा कायम ठेवली आहे़ विद्यालयाचा निकाल ९९़५२ टक्के लागला आहे.

या विद्यालयातील अरुंधती अशोक पवर ९९़४० टक्के गुण घेवून विद्यालयात प्रथम आली आहे़ विद्यालयातील ३५ विद्यार्थिनींनी ९० टक्केपेक्षा जास्त गुण घेतले आहेत़ ८० विद्यार्थिनी विशेष गुणवत्ता प्राप्त केली़ यशस्वी विद्यार्थिनींचे संस्थाध्यक्ष शैलेश लाहोटी, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष राजेंद्र मालपाणी, सचिव आशिष बाजपाई, शालेय समितीचे अध्यक्ष सूर्यप्रकाश धुत, सर्व सदस्य, मुख्याध्यापिका उषा शिंदे, निरीक्षीका सुनिता बोरगावकर, सर्व शिक्षीका, कर्मचाºयांनी अभिनंदन केले आहे़

तुळजाभवानी माध्यमिक विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत येथील तुळजाभवानी माध्यमिक विद्यालयाने आपली उज्वल यशाची परंपरा कायम ठेवत या विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

विद्यालयातून कु. राजश्री चंद्रकांत गायकवाड ८०.४० टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम आली आहे. पल्लवी विकास माने हीला ७६.४० टक्के गुण घेऊन द्वितीय तर यशवंत सुरेश रणदिवे याने ७६ टक्के गुण घेऊन तृतीय आला आहे. ३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले असून २२ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षक आमदार विक्रम काळे, एस. एस. सी. बोर्डाचे चेअरमन व्ही. के. खांडके, शिक्षणाधिकारी औदुंबर उकिरडे, मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती के. ए. जायेभाये, प्राचार्य डी. एन. केंद्रे, प्राचार्य संगमेश्­वर केंद्रे, समन्वयक स्वाती केंद्रे, प्राचार्य जी. आर. मुंडे, विधी सल्लागार राणी केंद्रे, व्ही.व्ही. लोहारे, श्रीमती व्ही. जी. स्वामी, ए. एस. पाचेगावकर, शिवकुमार चिकले यांनी अभिनंदन केले.

‘केशवराज’ची दहावी परीक्षेत यशाची परंपरा कायम
मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल बुधवार, दि. २९ जुलै रोजी घोषित करण्यात आला. या परीक्षेत शहरातील श्यामनगर भागातील श्री केशवराज विद्यालयाचा ९९.५७ टक्के इतका निकाल लागला आहे. हा निकाल विद्यालयाच्या गुणवत्तेची परंपरा कायम राखणारा असून, या परीक्षेत १०० टक्के गुण घेणारे विद्यालयातील २५ विद्यार्थी आहेत.
या परीक्षेस विद्यालयातून एकूण ७०० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ६९७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात २५ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण प्राप्त केले असून, ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांची संख्या ३०३ इतकी आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र आलूरकर, कार्यवाह नितीन शेटे, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष रावसाहेब तावशीकर, कार्यवाह जितेश चापसी, शालेय समिती अध्यक्ष आनंदराज देशपांडे, मुख्याध्यापक मंजुळदास गवते, उपमुख्याध्यापक सुनिल वसमतकर, पर्यवेक्षक यशवंत चव्हाण, अंबादास गायकवाड, दिलीप चव्हाण, दहावी विभागप्रमुख विलास झाटे, सहप्रमुख संजय राजपूत यांच्यासह विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांनी अभिनंदन केले आहे.

Read More  उस्मानाबादेत एकाच दिवसात १०५ कोरोनाबाधित रुग्ण

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या