लातूर : प्रतिनिधी
येथील के. जी. एन. टेस्ट ट्युबबेबी हॉस्पिटलमध्ये सरोगेट स्त्रीने दोन बाळांना जन्म दिला. डॉ. अमिर शेख यांच्य अथक प्रयत्नाला यश ओ असून संबंधीत कुटुंबाच्या आनंदाला पारावार राहिला नाही. दहा वर्षांपूवी एका खेडेगावातील डॉक्टरांकडे गेलेल्या एका कोवळ्या वयातच मातृत्व आलेल्या स्त्रीने आपले मुल तर गमावलेच होते. परंतु तिचा गर्भाशयही शस्त्रक्रिया करुन काढण्यात आलेला होता. सदर महिला येथील के. जी. एन. टेस्ट ट्युबबेबी हॉस्पिटलमध्ये साधारणत: एका वर्षापुर्वी आली होती.
तेव्हा डॉ. रझिया शेख हयात होत्या. त्यांनी व डॉ. अमिर शेख यांनी सरोगसीबाबत त्या महिलेस संपूर्ण माहिती दिली. सदर महिला व त्याच्या नातेवाईकांनी सरोगसीला होकार दिला. डॉ. अमिर शेख यांनी सरोगेट मदरवर उपचार केले. सरोगेट मदर गर्भवती झाली व तीने काल दोन गोंडस बाळांना जन्म दिला. डॉ. अमिर शेख यांना डॉ. विशाल मैंदरकर, डॉ. माधुरी कदम यांनी सहकार्य केले.