लातूर : प्रतिनिधी
आजकाल लहानापासुन ते
थेट वृध्दापर्यंत शहरी असो की ग्रामीण प्रत्येकजण आपला किंमती वेळ, उर्जा, क्रयशक्ती व पैसा वाया घालतो आहे. त्याऐवजी बालवयापासुन पुुस्तक वाचनाची गोडी शाळा कॉलेजपासुन लावायला हवी. गावात, शहरात लहानमोठी साहित्य संमेलने व्हायला हावीत, असे मत अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था पुणेचे अध्यक्ष राजन लाखे यांनी केले. येथील प्रकाशनगरातील सरस्वती विद्यालयात आयोजित पहिल्या बालकुमार साहित्य समेलन व लातूर शाखेचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. त्यावेळी संम्मेलानाध्यक्ष बालसाहित्यिक प्रकाश घादगिने, लातूर शाखा अध्यक्ष रमेश चिल्ले, सचिव नागनाथ कलवले, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य ऍड. लक्ष्मणराव भागवत उपस्थित होेते. सम्मेलंनाचे प्रास्ताविक शाखाध्यक्ष रमेश चिल्ले यांनी सम्मेलना मागील व शाखेबद्दल भुमिका विषद केली. पुढील काळात बालसाहित्य पुरस्कार, पुस्तक प्रकाशने व साहित्यीक उपक्रम घेण्यात येणार असल्याचे सांगीतले. संमेलाना अध्यक्ष प्रकाश घादगिने यांनी बालसाहित्याचा आढावा घेतला. तर ऍड. भागवत यांनी पुढील काळात यातून भावी साहित्यीक घडण्यास मदत होणार आहे. याच कार्यक्रमात राज्य शासनाचा बालकथेचा साने गुरुजी बालकाव्य पुरस्कार मिळाल्याबद्दल वृषाली पाटील याचा व स्वाराती विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल उमा व्यास तसेच भारत सरकारचा पुरस्कार मिळाल्याबददल सविता धर्माधिकारी या तिन्ही सदस्यंचा मान्यंवराचे हस्ते सत्कार करण्यात आला.
कथाकथन सत्रात केंर्द्रीय कार्यकारीचे सचिव डॉ. दिलीप गरुड व जी. जी. कांबळे यांची मुलांना गोष्टीमध्ये हसायला व अंंतर्मुख होण्यास भाग पाडले. भारत सातपुतेच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात रमेश चिल्ले, नाथनाथ कलवले, कल्याण राऊत, उषा भोसले, शैलजा कांरडे, नयन राजमाने, दतप्रसांद झंवर, गोविद गारकर, सुलक्षणा सोनवणे, सुनिता मोटे, सविता धर्माधिकारी, सुनिता देशमुुख, विजया भणगे, रमेश हणमंते, निलीमा देशमुख व मुलांनी ही कविता सादर केली. याप्रसंगी उपमुख्याध्यापक आर. डी. कुलकर्णी, राजकुमार गायकवाड, पंडीत देवकते, भस्मे, श्रीमंगले शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संम्मेलनांचे सुत्रसंचलन सुनिता देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन राजकुमार दाभाडे यांनी मानले.