22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूरगंजगोलाईवर तिरंगा फडकला अन् लातूरकरांनी एकच जल्लोष केला

गंजगोलाईवर तिरंगा फडकला अन् लातूरकरांनी एकच जल्लोष केला

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
काळ निजामशाहीचा होता, मोठी दहशत होती. एकीकडे देश स्वातंत्र झाला म्हणून जल्लोष होता…लातूरमधील तरुणांनी अत्यंत धाडसाने, निजाम पोलीसांचा कडक पाहरा असताना त्यांना चकम्मा देऊन गंजगोलाईवर निजामशाहीचा फडकणारा ध्वज उतरवून तिरंगा चढवला होता. ती रोम हर्षक घटनाच कामदार रोडवरील अमर गणेश मंडळांने लेजर शोच्या माध्यमातून सादर केली आहे. हा ऐतिहासिक प्रसंग पाहण्यासाठी शेकडो लातूरकरांनी एकच गर्दी केली होती.

या देखाव्याचे उद्घाटन थोर स्वातंत्र्य सेनानी मुर्गप्पा खुमसे यांच्या हस्ते झाले. जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी पत्रकार अशोक चिंचोले, नगरसेवक अशोक गोविंदपुरकर, ज्येष्ठ विधिज्ञ उदय गवारे, पत्रकार दीपरत्न निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मराठवाडा मुक्तिसंग्रामात लातुरकरांचा ंसिंहाचा वाटा असून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली लातुरचे असंख्य क्रांतीकारक या मुक्ती आंदोलनातील धाडसी उपक्रमात सक्रिय होते. निजामाला सळो की पळो करुन सोडण्यासाठी लातुरकरानी विविध मार्गाने आंदोलन तीव्र केले. यातीलच एक घटना म्हणजे लातुरच्या गंजगोलाईतील निजामशाही टावरवर असलेला निजामशाही ध्वज उतरुन त्याठिकाणी भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा चढवण्याचे काम लातुरच्या बहादुर स्वातंत्र्य सेनानीनी केल्याचे मुर्गप्पा खुमसे म्हणाले.

मराठवाडा मुक्ती संग्रामातील लातूर जिल्ह्यातील योगदान हे अनन्य साधारण असे आहे. गंजगोलाईवर तिरंगा फडकावणे ही घटना तर मुक्ती लढ्यातील सोनेरी पान आहे, त्या रोमहर्षक ऐतिहासिक घटनेला लेजर शोच्या माध्यमातून अमर गणेश मंडळाने देखाव्याच्या रुपात दाखवून उजाळा दिला. येणा-या १७ सप्टेंबरपासून मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सवी वर्षे सुरु होतं आहे. अशा प्रसंगी असा देखावा दाखवून अमर गणेश मंडळाने या अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवातच केली असल्याची भावना जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी बोलून दाखविली. या स्वातंत्र्यासाठी आपल्या मागच्या पिढ्यांनी केलेला त्याग, बलिदान त्या प्रती कृतज्ञता म्हणून हा देखावा तयार केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या