27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरभटक्या विमुक्त जमातींचा खरा इतिहास पडद्याआडच

भटक्या विमुक्त जमातींचा खरा इतिहास पडद्याआडच

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
प्राचीन ऐतिहासिक काळापासून भटक्या विमुक्त जमाती या देशात रहातात. ते या देशाचे भूमिपुत्र आहेत. पण गावगाड्यात त्यांना कुठे ही स्थान नसल्यामुळे त्यांची सामाजिक व सांस्कृतिक माहिती उच्च वर्णियांना समजली नाही. त्यामुळे या जमाती अनभिज्ञ राहील्या. या जमातींचा खरा इतिहास समोर आला नाही, अशी खंत ‘देशोधडी’ या आत्मकथनाचे लेखक डॉ. नारायण भोसले यांनी व्यक्त केली.

भारतीय भटक्या विमुक्त जमाती विकास संघटनेच्यावतीने आयोजित केलेल्या विलास माने लिखीत ‘कत्ती’, रामराजे आत्राम लिखीत ‘उघडा दरवाजा’, व डॉ. नारायण भोसले लिखीत ‘देशोधडी’ या आत्मकथनावरील चर्चा सत्रात डॉ. भोसले बोलत होते. या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. अनिल जायभाये होते. चळवळीमुळे मी घडलो. संघटनेच्या माध्यमातून संघर्ष करतांना जे अनुभव आले तेच मी ‘कत्ती’ मध्ये मांडले आहेत, असे विलास माने यांनी सांगितले. आदिवासीच्या जंगलातील झोपडीला दारच नसते त्यामुळे मी ‘उघडा दरवाजा’, असे नाव आत्मकथनाला दिले आहे असे राम अत्राम यांनी सांगितले. या आत्मकथनावर डॉ. अंकुश चव्हाण व डॉ. अशोक नारनवरे यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. चर्चा सत्राचे प्रास्ताविक भटक्या विमुक्तांचे नेते प्रा. सुधीर अनवले यांनी केले. सुत्रसंचलन प्रा दिपक पाचंगे यांनी केले.

या चर्चासत्रास कैकाडी, जोशी, वडार, तिरमलि, गोसावी, वासुदेव, फकीर, डक्कलवार, गोंधळी, लोहार अशा जमातीच स्त्री- पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच लातुरातील अनेक बुद्धीवादी कार्यकर्ते उपस्थित होते. लिंबराज जाधव, गोपाळ सरवदे, दादाराव भोसले, लक्ष्मण बोर्हाडे, फरीद शाह, ऐरावन भोळे, मनोहर गायकवाड, शंकर भोसले या कार्यकर्त्यांनी चर्चा सत्र यशस्वी केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या