24.8 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeलातूरनागझरी बराजचे दोन दरवाजे उघडले

नागझरी बराजचे दोन दरवाजे उघडले

एकमत ऑनलाईन

लातूर : तालुक्यातील नागझरी बराजमध्ये ८० टक्के पाणीसाठा करुन उर्वरीत पाणी २.८५ घनमीटर सेकंदाने दोन दरवाज्याद्वारे मांजरा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नागझरीपासून पूढे बिंदगीहाळपर्यंतची बराज शृंखला जलमय होणार आहे.

यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंत मोठा पाऊस पडलेला नव्हता. त्यामुळे मोठे, मध्यम व लघू प्रकल्पांमध्ये पाण्याची पातळी वाढलेली नव्हती. दि. १६ जुलैपर्यंत मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात केवळ ६२ मिलीमीटर पाऊस पडला होता. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झालेली नव्हती. परंतू, दि. १९ जुलैपासून आजपर्यंत मांजरा धरण आणि मांजरा नदीच्या पाणलोटक्षेत्रात ब-यापैकी पाऊस पडल्याने दि. २२ जुलै रोजी मांजरा धरणाचा पाणीसाठ्यात ६ दशलक्षघनमीटरने वाढ झाली आहे. नागझरी बराजमध्येही मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे.

नागझरी बराजमध्ये ८० टक्के पाणीसाठा करुन उर्वरीत पाणी २.८५ घनमीटर सेकंदाने दोन दरवाज्यांद्वारे नदीपात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे नागझरी बराजमधून सोडलेले पाणी साई बराज, खुलगापूर बराज, शिवणी बराज आणि पुढे बिंदगीहाळ बराजपर्यंत जाणार असल्यामुळे मांजरा नदीवरील बराजची शृंखला जलमय होणार आहे.

साहेबांच्या दूरदृष्टीचा शेतक-यांना लाभ
लातूर जिल्ह्यात एकही मोठी नदी नाही. मांजरा नदी हिच लातूर जिल्ह्यातील शेतक-यांची जीवनदायिनी आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊसातही मांजरा नदी कायम जलमय राहावी. त्याचा शेतक-यांना लाभ व्हावा. सिंचनाचे क्षेत्र वाढावे. ही दूरदृष्टी ठेवुन विकासरत्न विलासराव देशमुख यांनी मांजरा नदीवर बराजची शृंखला निर्माण केली. त्यामुळे मांजरा नदी कायमस्वरुपी जलमय राहात आहे. त्याचा लाभ शेतक-यांना होतो आहे.

 

महाराष्ट्रात पावसाचे थैमान, कोकणात हाहाकार, चिपळूणसह अनेक गावांना पुराचा वेढा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या