25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeलातूरउदगीर-एनकी-मानकी रस्ता पहिल्याच पावसात उखडला

उदगीर-एनकी-मानकी रस्ता पहिल्याच पावसात उखडला

एकमत ऑनलाईन

उदगीर : बबन कांबळे
येनकी ते मानकी जाणा-या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचे वारंवार निर्दशनास अणुन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने झोपेचे सोंग घेतल्याने पहिल्याच पावसात रस्ता जागोजागी उखडल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग निकृष्ट कामाचा उदगीर पॅटर्न निर्माण करीत असल्याची चर्चा असून जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. तर वरिष्ठ अधिका-यांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्यामुळे जनतेच्या लाखो रुपयांचा चुराडा झाला आहे. उदगीर ते येनकी मानकी रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यात झाले होते.

या रस्त्यावर वेगवेगळया टप्प्यात कामे करण्यात आले होते. रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्यामुळे सुरू असलेले बीबीएम उखडत असल्याचे व कार्पेट एकसमान न पडता उंच-सखल होत असल्याची बाब जनतेनी व माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या अधिका-यांनी कामाच्या दर्जाकडे लक्ष दिले नसल्यामुळे पहिल्याच पावसात रस्ता जागोजागी दबला व उखडला आहे. त्यामुळे बांधकाम विभागाची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत. शासन लाखो रुपयांचा खर्च करून जनतेसाठी रस्ते बनवत असताना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नाकर्तेपणामुळे लाखो रुपयांचा चुराडा करून उदगीर येनकी मानकी रस्त्यावर प्रवाशांना हाल सोसावे लागत आहेत. त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत असून त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या