26.9 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeलातूरलातुरात ‘वसुंधरारत्न’ पुरस्कार सोहळा थाटात

लातुरात ‘वसुंधरारत्न’ पुरस्कार सोहळा थाटात

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
शहरातील विविध गणेश मंडळ, पोलीस अधिकारी आणि कर्मचारी, वैद्यकीय सेवेत योगदान देणारे व्यक्ती, वृक्ष मित्र, प्राणी मित्र, विद्युत सेवा देणारे कर्मचारी आणि कोविड काळात लातूरकरांची सेवा करणारे माजी उपमहापौर आदी मान्यवरांचा ‘वसुंधरारत्न’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

वृक्ष लागवड आणि संवर्धनसाठी पुढाकार घेणा-या गणेश मंडळांचा यात विशेष गौरव झाला. याशिवाय आर.जे. कॉम्प्लेक्स परिसरात भव्य मंडप उभारून आलेल्या प्रत्येक गणेश मंडळांच्या अध्यक्ष आणि सचिवांचे वृक्ष रोप देऊन स्वागत करण्यात आले. शिवाय, आलेल्या प्रत्येक गणेश भक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती. रात्री उशिरा वसुंधरा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी राजीव गांधी चौक ते आदर्श कॉलनी भागात स्वच्छता मोहीम राबवून रस्त्यावर पडलेल्या पाणी बॉटल्स, वेफर्स उचलले. वसुंधरारत्न पुरस्कार सोहळा बंसल क्लासेस आणि वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने गणेश विसर्जन दिवशी आयोजित करण्यात आला होता.

यावेळी लातूरचे उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, राजा गणपतीचे संस्थापक अध्यक्ष शाम जाधव, अमर गणेश मंडळ, लातूरचा श्रीमंत गणेशोत्सव, सुबोध गणेश मंडळ, आंबिका गणेश मंडळ, बंजारा गणेश मंडळ, सार्वजनिक गणेश मंडळ, आलमला (ता.औसा), जय महाराष्ट्र गणेश मंडळ, यशराज गणेश मंडळ, विनायक गणेश मंडळ, ओडियाराज गणेश मंडळ यांच्यासह गणेशोत्सव काळात १० दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेणारे राजीव गांधी चौकातील माधवबागचे अर्जुन महानुरे, डॉ. बी. आर. पाटील, मल्लखांबपट्टू रामंिलग बिडवे, वाहतूक पोलीस निरीक्षक सुनीलकुमार बिर्ला, सहायक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक बालासाहेब मस्के आदींचा सन्मानचिन्ह, शाल, वृक्ष आणि पुस्तिका भेट देऊन गौरव करण्यात आला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या