25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरविधवा महिलेने केले गायीच्या वासराचे बारसे

विधवा महिलेने केले गायीच्या वासराचे बारसे

एकमत ऑनलाईन

देवणी : देवणी तालुक्यातील कोनाळी येथे अपत्य नसलेल्या विधवा महिलेच्या वतीने सोमवारी दि.१३ जून रोजी चक्क गायीच्या वासराचं बारसं घालून गायीसह वासराची भजन करीत वाजतगाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली व तसेच नामकरण सोहळ्यासाठी गाव जेवण देऊन आपल्याला अपत्य नसलेतरी काय झाले गायीचे वासरू आपल्या अपत्या प्रमाणेच आहे. म्हणून गाय व वासरू यांच्यावरील प्रेमापोटी असा आगळा- वेगळा नामकरण सोहळा साजरा करण्यात आला.

कोनाळी येथे माहेरी वयोवृद्ध आईकडे राहात असलेल्या गौळणबाई यांचा विवाह औसा येथील लक्ष्मण सूर्यवंशी यांच्याशी चाळीस वर्षापूर्वी झाला होता. गौळणबाई यांच्या पतीचे सन १९८९ साली निधन झाले. तेव्हापासून गौळणबाई या माहेरी आईकडे राहून मजुरी करून उपजीविका भागवीत. पतीच्या निधनानंतर आपलं अख्खा आयुष्य वारकरी संप्रदायात झोकून घेतलेल्या गौळणबाई हे. पंढरपूर, आळंदी येथे वारी करण्यात आपला अधिकचा वेळ घालवीत असत. मात्र कोरोना काळात पंढरपूर व आळंदी येथे वारी बंद झाली. गौळणबाई यांनी कोनाळी येथे आपल्या गरिबीतून गाय विकत घेतली. गौळणबाई यांच्या समोर एकीकडे पतीच्या निधनानंतर आलेले संकट उभे राहीले होते. तर अपत्य नसल्याची खंत ही त्यांना भेडसावत होती. मात्र गायीच्या पालन पोषण करीत असलाना त्यांना गायीचा लळा लागला.

गौळणबाईनीं गायीचे नाव कमला असे ठेवले. त्यानंतर आता गायीला दि. २६ मे रोजी वासरू झाले त्याचा सोमवारी नामकरण सोहळा ठेवण्यात आला. त्याचे नाव पाळणा घालून कान्हा ठेवण्यात आले. गौळणबाई हे वासराशी लळा लागल्याने आनंदून जावून मुलाप्रमाणे बारसे साजरे करण्यासाठी वारकरी मंडळ बोलावून भजन करीत वाजत गाजत गावातून मिरवणूक काढून मारोतीला प्रदिक्षणा घातल्या व महिला भगिनींना सोबत घेऊन आपल्या वासराचा पाळणा घातला व नामकरण सोहळ्यासाठी गाव जेवणही दिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकला शिवाजी पोलकर, गौतम माने यांच्यासह आदींनी परिश्रम घेतले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या