19.6 C
Latur
Sunday, February 5, 2023
Homeलातूरबी.बी.एम.चे काम चार दिवसांतच उखडले !

बी.बी.एम.चे काम चार दिवसांतच उखडले !

एकमत ऑनलाईन

जळकोट : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या वतीने वांजरवाडा ते जळकोट तसेच धोंड वाडी ते वृत्ती या रस्त्याचे काम सुरू आहे. परंतु या रस्त्याचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत आहे. या रत्यावर करण्यात आलेले बी. बी. एम. चे कामही चार दिवसातच उखडून गेले असून या कामाची तात्काळ चौकशी करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबत धर्मापाल देवशेटे मित्र मंडळाच्या वतीने जळकोटचे गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार यांना निवेदन देण्यात आले.
लातूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागा अंतर्गत जळकोट तालुक्यामध्ये अनेक रस्त्यांची कामे चालू आहेत. तालुक्यांमध्ये ही अत्यंत निकृष्ट अशी दर्जाची कामे होत आहेत. रस्त्यासाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर आहे.

मात्र रस्ता करत असताना व्यवस्थित साहित्य न वापरल्यामुळे चार दिवसातच रस्ता उखडून जात आहे. वांजरवाडा ते जळकोट या अतिशय महत्त्वपूर्ण समजल्या जाणा-या रस्त्याचे काम सुरू आहे. गत अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरावस्था झाली होती. यामुळे प्रशासनाने हा रस्ता मंजूर केला आहे. या ठिकाणी लातूर येथील जिल्हा परिषद अंतर्गत बांधकाम विभागाच्या वतीने हे काम करण्यात येत आहे. परंतु या रस्त्यावर जे बी. बी. एम. केलेले आहे. ते चार दिवसातच उकळून गेले आहे.

मोठमोठी गिट्टी रस्त्यावर उघडी पडली आहे. ही बाब धर्मपाल देवशेट्टे मित्र मंडळाच्या लक्षात आले असता, कार्यकर्त्यांनी जळकोट ते वांजरवाडा रस्त्याची पाहणी केली. तसेच सदरील खराब रस्त्याला हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला. तालुक्यामध्ये रस्त्याची कामे निकृष्ट होत असल्यामुळे एकत्र येऊन आंदोलन करण्याचा इशारा धर्मपाल देवशेटे मित्र मंडळाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. लातूर, तहसिलदार जळकोट तसेच गट विकास अधिकारी जळकोट यांच्याकडे निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर आरपीआयचे तालुकाध्यक्ष विनोद कांबळे, विवेकानंद देवशेट्टे, परमेश्वर आनंमवाड, बालाजी पवार,बालाजी तिडके, ज्ञानेश्वर भोपळे, शैलेश नागसाखरे, धनराज पाटील,यशवंत बनसोडे, राजेश्वर पवार, ओमकार टाले, रामेश्वर पाटील, विजयकुमार केंद्रे आदींच्या स्वाक्ष-या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या