29.5 C
Latur
Tuesday, March 28, 2023
Homeलातूरचाकूर येथील घरकुलांची कामे कासवगतीने

चाकूर येथील घरकुलांची कामे कासवगतीने

एकमत ऑनलाईन

चाकूर : प्रतिनिधी
चाकूर नगरपंचायत अंतर्गत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत तीन याद्या मंजूर झाल्या आहेत. पहिल्या यादीत १०९ लाभार्थ्यांंची निवड, दुस-या यादीत ९८ लाभार्थ्यांची निवड तर तिस-या यादीत १६९ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. चाकूर शहरात पंतप्रधान आवास योजनेचे काम कासवगतीने होत आहे.

पहिल्या यादीत मंजूर झालेल्या १०९ पैकी ३८ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता टाकण्यात आला. दुस-या यादीतील मंजूर ९८ पैकी ४ लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता टाकण्यात आला तर तिस-या यादीतील १६९ पैकी ३ लाभार्थ्यांच्या नावावर हप्ता टाकला आहे.१४ लाभार्थ्यांंच्या नावावर लवकरच पहिला हप्ता टाकण्यात येणार आहे. ३७१ मंजूर घरकूल योजनेतील ४५ लाभार्थ्यांच्या खात्यावर पहिला हप्ता टाकण्यात आला आहे.

१४ लाभार्थ्यांच्या खात्यात हप्ता पडणार आहे. पंतप्रधान आवास योजना व रमाई घरकूल योजनेअंतर्गत चाकू शहरात ३९१ लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांचे स्वत:च्या हक्काच्या घरकुलाचे स्वप्न वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने अनुदानाचे पहिला हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला आहे. केंद्र सरकार कडून दरवर्षी प्रत्येक तालुक्याला प्रतीक्षा यादी नुसार घरकुलसाठी पात्र लाभार्थ्यांची यादी मंजूर करण्यात येत असते सन २०२१-२२ या वार्षिक वर्षात पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चाकूर नगरपंचायतअंतर्गत गरीब लाभार्थ्यांची निवड घरकुल योजनेत करण्यात आली तर रमाई घरकुल योजनेत लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले.

एकूण ३७१ लाभार्थ्यांना घरकुल योजना मंजूर करण्यात येऊन त्यांना योजनेचा लाभ मुदतीत उपलब्ध करून देण्यासाठी परिपूर्ण प्रस्थाव कार्यालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या. शहरातील ३७१ मंजूर पैकी ५९ लाभार्थ्यांचे परिपूर्ण घरकुलाचे प्रस्ताव कार्यालयात सादर झाल्याने लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सन २०१५ ते २०२२ या कालावधीत मंजूर झालेल्या घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना अनुदानाचे हप्ते मिळण्यास विलंब झाला वेळेवर अनुदानाचे हप्ते खात्यावर जमा होत नसल्याने अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम अर्धवट सोडून दिले त्यांचे घरकुलाचे स्वप्न अधुरे राहिले आहे. चाकूर नगरपंचायत अंतर्गत ज्याना पंतप्रधान आवास योजना मंजूर झाली आहे.अशा पात्र प्रस्ताव कार्यालयात सादर करण्याच्या सूचना दिल्या. लवकर आपला प्रस्ताव नगरपंचायतीत सादर करुन योजनेचा लाभ घ्यावा असे आहवान भुरे बाळु सी.एल.टी.सी.आणि रवि डेगळे पी.एम.सी.यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या