24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeलातूरकार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे

कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे

एकमत ऑनलाईन

रेणापूर : प्रतिनिधी
गोर- गरिब सर्व सामन्याच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी व न्याय हक्कासाठी कार्यकर्त्यानी सदैव तत्पर रहावे, असे सांगून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत निवडणुकीसाठी तयारीला लागावे व पक्षाची ताकद दाखवून दयावी. पक्ष आपल्या पाठीशी खंबीर पणे उभा राहिल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा लातूर जिल्ह्याचे पक्ष निरिक्षक यांनी केले .

राष्ट्रवादी शहर व तालुका राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कार्यकर्त्याच्या बैठीकीचे आयोजन शुक्रवारी रेणापूर येथे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शहर कार्यालयात करण्यात आले होते. त्यावेळी पक्ष निरिक्षक डॉ. काळे बोलत होते. या बैठकित शहर व तालुक्याचा कामकाजाचा अहवाल शहराध्यक्ष बालाजी कदम यांनी मांडून तो काळे यांच्याकडे सादर केला. तसेच या बैठकित होऊ घातलेल्या रेणापूर नगरपंचायत, तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकित चर्चा करण्यात आली. रेणापूर तालुक्यात पक्षाची ताकद वाढण्यासाठी कार्यकर्त्यानी प्रयशील राहावे, असे सांगून डॉ. काळे म्हणाले की, होऊ घातलेल्या जि.प. पं.स. तसेच नगरपंचायत निवडणुकीत पक्षाचा झेंडा फडकावा. यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागवे. पक्षाला मजबुत करावे. येणा-या निवडणूकीत पक्ष आपल्या पाठीशी आहे. अशी ग्वाही पक्ष निरीक्षक डॉ. नरेंद्र काळे यांनी य् दिली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बालाजी कदम, ता. कार्याध्यक्ष रूपेश चक्रे, शहर कार्याध्यक्ष पाशा फरीद, उपाध्यक्ष शाम काळे, महिला शहराध्यक्षा राधाबाई डावळे, अर्चना पवार, वंदना आचार्य, अमोल पवार, चंद्रकांत गिरी, रमाकांत कुन्हाडे, वामनराव पाटील, मुसाभाई सय्यद, सुरज फुलारी, नानासाहेब काळे, इस्माईल शेख, राजकुमार नरवटे, सुभाष शिंदे, धिरज शिंदे, विशाल जोगदंड, महादु राठोड, सौरभ सावदे, शौकत सय्यद, मोहसीन शेख, अफसर सय्यद, अमन बागवान, शहनवाज कुरेशी, साहील शेख, महम्मद सय्यद, बिलाल बागवान, सोहेल बागवान, राहुल ठाकुर यांच्यासह अदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या