22.1 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeलातूरवृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना

वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
वृक्षांची जोपासना हीच निसर्गाची उपासना आहे. निसर्ग आपल्याला भरभरुन देतो. माणूस त्याच्या अंगाखांद्यावर जगतो आहे. निसर्ग आपला गुरु आहे. तो सन्मार्ग दाखवतो, असे मत माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केले. कृषी दिनानिमित्त विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा देवराई येथे विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी मांजरा देवराई प्रकल्पाची पाहणी केली. सप्टेंबर २०२० मध्ये त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा वृक्ष प्रकल्प उभारण्यात आला. कृषी दिनी त्यांच्या उपस्थितीमध्ये वृक्षारोपण ही करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा देवराई येथे शालेय मुलांना वृक्ष वेलींची ओळख व्हावी. फुलपाखरु, मधमाश्यांचे निसर्गातील महत्व मुलांना करुन देण्यासाठी एक देवराई निर्माण करण्यात आलेली आहे. या देवराईमध्ये एकूण पाच हजार पेक्षा जास्त लहान, मोठी झाडे जगवलेली आहेत. ही सर्व झाडे बियां गोळा करुन त्यापासून इथल्याच रोपवाटीकेमध्ये तयार करण्यात आलेली आहेत.

या वृक्ष प्रकल्पामध्ये पक्षांसाठी फळांची अनेक झाडे लावली आहेत. तसेच फुलांची, खजुराजी झाडे पण लावली आहेत. येथे एकुण ४० प्रकारची झाडे आहेत त्यात प्रामुख्याने पिंपरी, कवट, वड, पिंपळ, इंग्लिश चिंच, नांदुर्गी, चिंच, आंबा, डाळींब, सदाफुली, बांबू, कांचन, आकाश मोगरा, कदंब अशी अनेक झाडे आहेत. यावेळी मांजरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, जागृती शुगरचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, संचालक अशोक काळे, लातूर वृक्ष चळवळीचे सुपर्ण जगताप, सचिन दाताळ, संभाजी रेड्डी, बालाजी सोळुंके, सतीश पाटील वडगावकर, कारखान्याचे सर्व संचालक, विविध विभाग प्रमुख, अधिकारी, वृक्ष प्रेमी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या