27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरचंदनाच्या तीन झाडांची चोरी

चंदनाच्या तीन झाडांची चोरी

एकमत ऑनलाईन

देवणी : प्रतिनिधी
देवणी पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या रावणगाव शेत शिवारातील १७ वर्षे जुने असलेल्या तीन चंदनाच्या झाडांची चोरी झाल्या प्रकरणी शनिवार दि. ४ जून रोजी दुपारी सव्वादोन वाजण्याच्या सुमारास देवणी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उदगीर तालुक्यातील रावणगाव शेत शिवारात जहांगीर कासीम पटेल यांच्या शेतातील अंदाजे ३० हजार रुपये किमतीचे ३ चंदनाची झाडे अज्ञात आरोपींनी दि. ३ जून रोजी रात्री चोरून घेऊन गेले आहे. या प्रकरणी जहांगीर पटेल रा. रावणगाव यांच्या फिर्यादीवरून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १२७/२०२२ कलम ३७९ भादवी प्रमाणे अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हेडकाँस्टेबल उस्तुर्गे हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या