26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeलातूर... तर ‘गिव्ह इट अप’साठी सक्ती करु

… तर ‘गिव्ह इट अप’साठी सक्ती करु

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
अन्न सुरक्षा योजनेच्या निकषात बसत नसलेल्या लाभार्र्थ्यांनी या योजनेतून स्वत: बाहेर पडावे म्हणून ‘गिव्ह इट अप’उपक्रम सुरु करण्यत आला आहे. या उक्रमात सप्टेंबरअखेरपर्यंत सहभागी होऊन अन्न सुरक्षा योजनेतून स्वत:हून बाहेर पडावे, अन्यथा शासनाच्या निर्देशानूसार निकषात बसत नसलेल्या रेशनकार्डधारकांवर सक्तीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा लातूर जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदूने यांनी दिला आहे.

‘गिव्ह इट अप’ या उपक्रमाला वारंवार मुदतवाढ देण्यात येत आहे. त्यानंतरही खोट्या माहितीच्या आधारे अन्न सूरक्षा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. रेशनच्या धान्याची गरज नाही किंवा उत्पन्न जास्तीचे आहे, अशा नागरीकांना रेशनचे धान्य बंद करुनही शिधापत्रिका चालू ठेवणे शक्य आहे. रेशनवरील धान्य घेण्याची गरज नसेल तर, रेशनधारकांना अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडता येईल. रेशनवरील धान्य बंद करण्यासाठी पुरवठा विभागाशी संपर्क करावा. धान्याचा हक्क सोडल्यास इतर गरजूंपर्यंत धान्य देता येईल, त्यामुळे गरज नसलेल्या रेशनकार्डधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुने यांनी केले.

अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर
पडण्यासाठी निरंतर मोहीम शासनाने हाती घेतली आहे. त्यामुळे गरज नसलेल्या नागरीकांनी किंवा उत्पन्न वाढलेल्या नागरिकांना रेशनवरील धान्य बंद करता येईल. अंत्योदय आणि दारिद्रय रेषेखालील रेशनकार्डधारकांनी खोटी माहिती देऊन धान्य घेत असल्याची बाब निदर्शनास आल्यास संबंधितांकडून धान्याची रक्कम शासनाच्या निर्देशानूसार वसुल करता येणार आहे. या अनुषंगाने शासन कधी काय निर्णय घेईल, हे सांगता येत नसल्याने निकषात बसत नसलेल्या रेशनकार्डधारकांनी स्वत:हून अन्न सुरक्षा योजनेतून बाहेर पडनेच योग्य होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या