18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeलातूरलातूर विभागात विजेचे भारनियमन नाही

लातूर विभागात विजेचे भारनियमन नाही

एकमत ऑनलाईन

लातूर (एजाज शेख ) : देशभरात निर्माण झालेली कोळसा टंचाई आणि त्यामुळे निर्माण झालेले वीजनिर्मितीचे संकट ताजे असतानाच महाराष्ट्रातही ऐन सणासुदीच्या दिवसांत वीजसंकट गडद होण्याची चिन्हे आहेत. असे असले तरी लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद व बीड या जिल्ह्यांना लागेल तेवढी नाही परंतू लागते तेवढी वीज उपलब्ध असल्याने सध्या तरी लातूर विभागात विजेचे भारनियमन नाही.

देशभरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने कोळशाच्या बहुतांश खाणीमध्ये पाणी साचल्याने कोळशाच्या पुरवठ्यामध्ये तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. महावितरणने वीजपुरवठ्याचा करार केलेल्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये कोळशाअभावी वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. ऑक्टोबरमधील वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीतदेखील वाढ होत आहे. परिणामी विजेची मागणी व उपलब्धता यात निर्माण झालेली तफावत भरुन काढण्यासाठी महावितरणतर्फे युद्धपातळीवर विविध उपाययोजना करण्यात येत. संचारबंदीमुळे निर्माण झालेली विजेची तूट भरुन काढण्यासाठी वीजखरेदीसह जलविद्यूत व अन्य स्त्रोतांकडून वीजपुरवठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न महावितरणतर्फे सुरु करण्यात आलेले आहेत. खुल्या बाजारातून महागड्या दराने वीज खरेदी करावी लागत आहे.

महावितरणच्या लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद व बीड या तिन्ही जिल्ह्यांमधील नागरी भागामध्ये जेवढी वीज लागते तेवढी वीज सध्या तरी पुरवठा होत आहे. महावितरणने विविध उपाययोजना केलेल्या असल्यामुळे लातूर विभागात सध्या तरी वीजेचे भारनियमन नाही. परंतू, कोळसा टंचाईमुळे निर्माण झालेली विजेची तुट भरुन काढण्यासाठी महावितरणला शर्थीचे प्रयत्न करावे लागत आहे. सणासुदीच्या दिवसांत नागरी भागामध्ये वीज पुरवठा अखंडीत राहावा, यासाठी महावितरणने नियोजन केले आहे. सध्यातरी नियोजनानूसार लागते तेवढी वीज दिली जात आहे. परंतू, भविष्यात लागेल तेवढ्या विजेची उपलब्धता होण्यात व्यत्यय आला तर मात्र विजेचे भारनियमन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम झाल्याने विजेची मागणी सर्वाधिक असलेल्या सकाळ ६ ते १० आणि रात्री ६ ते १० या कालावधीत नागरिकांनी विजेचा वापर अतिशय काटकसरीने करावा. अधिक वीज वापर करणा-या साधनांचा वापर टाळावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. या कालावधीत विजेचा वापर कमी झाल्यास मागणी व उपलब्धता यातील तफावत कमी होईल व पुढेही भारनियमन करण्याची गरज भासणार नाही. नेहमीप्रमाणे सुरळीत वीजपुरवठा करणे शक्य होईल.

लातूर विभागाला प्रति महिना ३९१.३९ दशलक्ष युनिट वीज लागते
महावितणच्या लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्ह्यांना दर महिन्याला ३९१.३९ दशलक्ष युनिट वीज लागते. विभागाला दर दिवसाला सुमारे १३० कोटी ४६ लाख ३३३ युनिट वीज लागले.. जिल्हानिहाय विजेची गरज लक्षात घेतली तर लातूर जिल्ह्याला दर महिन्याला १२७.६९ दशलक्ष युनिट, दर दिवसाला ४२ लाख ५६ हजार ३३३ युनिट, उस्मानाबाद जिल्ह्याला दर महिन्याला १०५.४८ दशलक्ष युनिट, दर दिवसाला ३५ लाख १६ हजार युनिट, बीड जिल्ह्याला दर महिन्याला १५८.२४ दशक्षल युनिट तर दर दिवसाला ५२ लाख ७४ हजार युनिट वीज लागते. एवढी वीज सध्या लातूर विभागात सध्या उपलब्ध आहे.

कृषी वाहिन्यांच्या वीजपुरवठ्यात दोन तासांची कपात
संभाव्य वीज टंचाईचे संकट टाळण्यासाठी महावितरणने लातूर विभागात काही उपाययोजना केल्या आहेत. कृषी वाहिन्यांना दिवसा ८ व रात्री १० तास चक्राकार पद्धतीने वीजपूरवठा केला जात होता. सध्याची वीज टंचाईची परिस्थिती लक्षात घेता महावितरणने उपाययोजना केल्या आहेत. लातूर, उस्मानाबाद व बीड या तिन्ही जिल्ह्यात पावसाच्या वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडलेला आहे. त्यामुळे सध्या तरी कृषीपंपांना विजेची तितकीसी गरज नाही. ही बाब लक्षात घेता महावितरणने कृषी वाहिन्यांच्या रात्रीच्या १० तासांच्या वीजपुरवठ्यात २ तासांची कपात केली आहे. त्यामुळे आता सध्या कृषी वाहिन्यांना सकाळी ८ तर रात्रीही ८ तासच वीजपुरवठा केला जात आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या