24.4 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरउदगीर येथील बस स्थानकास लागली गळती

उदगीर येथील बस स्थानकास लागली गळती

एकमत ऑनलाईन

उदगीर : बबन कांबळे
सध्या उदगीरचे बस स्थानक हे मृत्यूच्या सापळ्यात सापडले असल्यामुळे, किती लोकांचा जीव घेणार?अशी चर्चा उदगीरमध्ये सर्वत्र सुरू आहे. उदगीरच्या बसस्थानकाची दुरवस्था झाली असून, या बसस्थानकाला पावसाच्या पाण्याने गळती लागली आहे. केव्हा काय होईल ते सांगता येत नाही. प्रवासी भयभीत झाले आहेत. उदगीरच्या पत्रकारांनी ही बाब प्रशासनाच्या व सरकारच्या निदर्शनास आणून देण्यासाठी, वृत्त प्रकाशित केले आहे. त्याचा अद्याप पावेतो काहीच परिणाम झाला नाही.

तत्कालीन आमदार सुधाकर भालेराव यांच्या कालावधीत मोठा गाजावाजा झाला. या बस स्थानकाची नवीन इमारत उभी राहणार या हेतूने कोनशिलाही बसविण्यात आली. त्यानंतर राज्यमंत्री संजय बनसोडे हे आमदार होऊन मंत्री झाले. यावेळी त्यांनी नवीन बसस्थानक कशा पद्धतीने होणार याचे चित्रही दिले होते. याकडे उदगीरच्या जनतेचे लक्ष पण लागून होते परंतु अचानक काय झाले ते त्यांनाच माहीत. आज पावेतो या बसस्थानकाकडे आमदार, प्रशासन व सरकार यांचे सतत दुर्लक्ष झाले आहे.

एकीकडे उदगीरचा विकास होत असताना, दुसरीकडे उदगीरचे बसस्थानक मृत्यूच्या सापळ्यात सापडल्याचे दिसून येत आहे. या बसस्थानकाकडे पहिल्यास हे बसस्थानक किती लोकांचे जीव घेणार? असे चित्र दिसून येत आहे. जर आमदार, खासदार, प्रशासन व सरकारने याकडे लक्ष दिल्यास आकस्मित घटना घडण्याची शक्यता आहे. हे बसस्थानक हे प्रवाशांच्या गैरसोयीचे आगर झाले आहे. बसस्थानकात खड्डे पडले असून त्यात पाणी साठत आहे तसेच या परिसरात कच-याचे ढीग पडल्याने वराहाचा वावर वाढला आहे. परिणामी दुर्गंधी पसरत असल्याने श्वास गुदमरतो आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या