Sunday, September 24, 2023

लातूर जिल्ह्यात १ ते १५ ऑगस्टदरम्यान लॉकडाऊन असणार पण त्याचे स्वरुप आज ठरणार

लातूर : लातूर जिल्ह्यातील लॉकडाऊन आज दि. ३१ जुलै रोजी संपणार असले तरी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दि. ३० जुलै रोज लाईव्ह संवादामध्ये बोलताना दि. १ ते १५ ऑगस्टदरम्यान असणार असून ते कशापद्धतीचे असेल, त्याचे स्वरुप कसे असेल हे शुक्रवारी निश्चित होणार असल्याचे सांगीतले.

जिल्हाधिकारी जी. श्रीकांत पुढे म्हणाले की, लातूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरांमध्येही कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात तपासण्या होण्याची गरज आहे. दि. १५ ते ३१ जुलै या कालावधीत लातूर जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. हे लॉकडाऊन कडक पद्धतीने करण्यात आले.

संपूर्ण लॉकडाऊन पुर्णपणे उघडणे घातक ठरेल, असे सर्वांचेच म्हणणे आहे. यापुढेही लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीच्या सुचना आहेत. त्यानूसार पुढील लॉकडाऊनचे स्वरुप कसे असेल हे शुक्रवारी ठरेल.

Read More  आई वडीलांचे छत्र हरवलेल्या वैष्णवीस ९८ टक्केगुण

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या