22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरशोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रबोधनात्मक व्याखान होणार

शोभायात्रा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह प्रबोधनात्मक व्याखान होणार

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही लातूर जिल्हा माहेश्वरी सभेच्या वतीने महेश नवमीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माहेश्वरी सभेचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड यांनी दिली. यावर्षी दि. ८ जून २०२२ रोजी महेश नवमीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. महेश नवमीच्या आयोजनाच्या दृष्टीने नुकतीच एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत राजकुमार पल्लोड यांसह श्रीनिवास लाहोटी, डॉ. गोपाल बाहेती, डॉ. चेतन सारडा, सीए प्रकाश कासट, दिलीप सोमाणी, गोकुळदास चांडक, द्वारकादास सोनी, सत्यनारायण हेड्डा, जयप्रकाश खटोड, अशोक जाजू, ओमप्रकाश तोष्णीवाल, शंकर कलंत्री, ईश्वरप्रसाद डागा, हुकूमचंद कलंत्री, राजेश मुंदडा, बालकिशन मुंदडा, अनुराधा कर्वा, रवीश तोष्णीवाल, योगेश मालपाणी, विनय भुतडा, नंदकिशोर लोया, गोविंद कोठारी जुगलकिशोर भंडारी यांची उपस्थिती होती.

महेश नवमीचे औचित्य साधून रविवार, दि. ५ जून रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये एकल गायन स्पर्धा, एकल वाद्य यंत्र स्पर्धा, स्टॅन्ड अप कॉमेडी, एकल दिव्यांग माहेश्वरी सुपरस्टार स्पर्धा, एकल डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स स्पर्धा तीन वयोगटात होणार आहेत. तसेच सायंकाळी चार वाजता ६० वर्षावरील ज्येष्ठांसाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धा मार्केट यार्डातील स्व. दगडोजीराव देशमुख सभागृहात होणार आहेत. दुपारच्या सत्रात प्रबोधन पर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे उपसभापती अशोक बंग, सहकार आयुक्त सतीश सोनी, निवडणूक आयोग नवी दिल्लीचे संचालक संतोष अजमेरा यांचे व्याख्यान होणार आहे.

सोमवार दि. ६ जून रोजी राजस्थानी लोककला सांस्कृतिक कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे यजम्ाांन पन्नालाल कलंत्री हे आहेत. बुधवार दि. ८ जून रोजी सकाळी ८ वाजता मार्केट यार्डातील गौरीशंकर मंदिरापासून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेचे प्रमुख द्वारकादास सोनी हे आहेत. ही शोभायात्रा गौरीशंकर मंदिरापासून निघून हनुमान चौक, गंज गोलाई, सुभाष चौक, दयाराम रोड, खडक हनुमान मार्गे बालाजी मंदिरात विसर्जित होईल.

या भव्य शोभायात्रेत उंट, घोडे, भालदार – चोपदार, भजनी मंडळ मोठ्या संख्येने सहभागी होणारे आहेत. बालाजी मंदिरात आरती होऊन महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. यावर्षीच्या महाप्रसादाचे यजमान पल्लोड परिवार हे आहेत. महेश नवमीच्या या सर्व कार्यक्रमात माहेश्वरी समाज बांधवानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन लातूर जिल्हा माहेश्वरी सभेचे अध्यक्ष राजकुमार पल्लोड, सचिव फुलचंद काबरा, कोषाध्यक्ष गोंिवद कोठारी, संघटन मंत्री राजेशकुमार मंत्री, सांस्कृतिक प्रमुख विनय भुतडा, महेश नवमी उत्सव २०२२ प्रोजेक्ट चेअरमन लक्ष्मीकांत कालिया, महिला संघटनच्या सौ. सरिता मुंदडा, सौ. वंदना दरक, लातूर शहर माहेश्वरी सभेचे नंदकिशोर लोया, युवा संगठनचे केतन बजाज, प्रसिद्धी प्रमुख श्याम भट्टड यांनी केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या