24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरचाकूर तालुका खरेदी विक्री संघास तृतीय पुरस्कार

चाकूर तालुका खरेदी विक्री संघास तृतीय पुरस्कार

एकमत ऑनलाईन

चाकूर : चाकूर तालुका खरेदी विक्री संघास राज्य पातळीवरील तृतीय पुरस्कार प्राप्त झाला असून या संस्थेचे व्हाईस चेअरमन राधाकिशन तेलंग आणि संचालक शिवाजी बैनगिरे यांनी सदर पुरस्कार मुंबई येथे झालेल्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. सदर वार्षिक सर्वसाधारण सभा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जगन्नाथ भोसले मार्ग,मंत्रालया समोर, नरिमन पॉइंट मुंबई येथे दि २४ मे रोजी दुपारंी साडेबारा वाजता झाली आहे.

चाकूर तालुका खरेदी विक्री संघास २०२०-२१ मध्ये उत्कृष्ट तेल बिया, कडधान्ये खरेदीदार संस्था (नाफेड विभाग) म्हणून तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य पणन महासंघाच्या वतीने प्रमाण पञ देऊन गौरविण्यात आले आहे. या प्रसंगी महाराष्ट्र पणन महासंघाचे चेअरमन तथा आमदार बाबासाहेब पाटील, व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. याप्रसंगी संचालक रामचंद्र शेळके, जिल्हा पणन अधिकारी वाय.ई.सुमठाणे उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या वतीने चाकूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघ मर्यादित .चाकूर इ. स. २०२१ मध्ये कडधान्य व तेलबिया खरेदी हंगाम मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. चाकूर तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाची स्थापना दि. २७ डिसेंबर १९९३ रोजी झाली असून तेव्हापासूनच सदर संघ हा शेतक-याच्या हितासाठी कार्यरत आहे .

संस्थेचे चेअरमन डॉ. चंद्रप्रकाश नागिमे यांच्या मार्गदर्शनाखाली तूर – चना खरेदी हंगाम २०२१ मध्ये तुरीची एकूण खरेदी २१९४१ क्वि.टल तर चना एकूण खरेदी ३४१३२ क्विंटल अशी विक्रमी खरेदी केली होती. सदर कार्याची दखल महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाने त्याचप्रमाणे नाफेडच्या वतीने घेण्यात आली आणि त्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. चालू हंगामात एकूण २८९९२ क्विंटल चना खरेदी झाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या