25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeलातूरजळकोट-कपीलधार ंिदंडीला तृतीय पुरस्कार

जळकोट-कपीलधार ंिदंडीला तृतीय पुरस्कार

एकमत ऑनलाईन

जळकोट : वसुंधरारत्न डॉक्टर शिवंिलंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेने व सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, विरुपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, सद्गुगुरु राजेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली जळकोट ते कपिलाधार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेचे हे २२ वे वर्ष आहे. जळकोट ते कपिलधार या ंिदंडीला उत्कृष्ट ंिदंडीचा तृतीय पुरस्कार देण्यात आला आहे .

जळकोट येथून निघणा-या पदयात्रेमध्ये चांगली व्यवस्था करण्यात आली होती. या पद यात्रेमध्ये ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करण्यात आले. या पदयात्रेमध्ये विविध असे आध्यात्मिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते, यासोबतच जळकोट येथील ंिदंडीमधील सर्व सदभक्तांनी शिस्तीचे पालन केल्यामुळे जळकोट येथील ंिदंडीला उत्कृष्ट ंिदंडी तृतीय पुरस्कार कपिलाधार येथील एका कार्यक्रमांमध्ये देण्यात आला .

सद्गुरु राजेश्वर स्वामी महाराज अहमदपूरकर, येरटे महाराज, शंकरंिलंग शिवाचार्य महाराज , बाळानंद महाराज, सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीमध्ये जळकोट येथील ंिदडी प्रमुख अशोक कारभारी व मारुती भालके यांना सन्मानचिन्ह देऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कमिटीचे अध्यक्ष भगवंतराव पाटील, मन्मथ बालापुरे , बाबुराव सोनटक्के , हैबतपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जळकोट येथून जळकोट ते कपिलाधार या पद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. जळकोट ते कपिलधार चालणा-या पदयात्रेला उत्कृष्ट ंिदडी पुरस्कार मिळाल्याबद्दल ंिदडी प्रमुख तसेच ंिदडीमधील सर्व सदभक्तांचे अभिनंदन केले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या