26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरयंदाही मोटेगावकरांची ‘आरसीसी’ देणार रिपीटरच्या २००० विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप

यंदाही मोटेगावकरांची ‘आरसीसी’ देणार रिपीटरच्या २००० विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
ज्या विद्यार्थ्यांनी ठरवलं आहे मला डॉक्टरचं व्हायचंय!, मला माझ्या स्वप्नांशी तडजोड करायची नाही! अशा विद्यार्थ्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी मोटेगावकर सरांच्या ‘आरसीसी’ ने ‘नीट टार्गेट-२०२३’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही स्कॉलरशिप एक्झामद्वारे ‘आरसीसी’ २००० विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणार आहे. तरी विद्यार्थ्यांनी ‘आरसीसी’ च्या लातूर, नांदेड आणि औरंगाबाद या तीनही शाखेत लवकरात लवकर नोंदणी करावी. ‘नीट टार्गेट-२०२३’ मध्ये सहभागी होऊन स्कॉलरशिप मिळवून आपले डॉक्टर होण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवा, असे आवाहन ‘आरसीसी’ शैक्षणिक संकुलाचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर यांनी केले आहे.

देशभरात शिक्षणाचा पॅटर्न म्हणून आज ‘आरसीसी’ चा नावलौकिक आहे. मागील २२ वर्षांपासून विश्वासार्हता कायम असलेली प्रा. मोटेगावकर सरांची ‘आरसीसी’ ही देशात सर्वोत्तम निकाल देणारी संस्था असल्याचे सिद्ध झाले आहे. एमबीबीएस, वैद्यकीय शिक्षण प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या प्रवेशपूर्व परीक्षेची तयारी दर्जेदार करुन घेणारी विश्वासाची संस्था म्हणून ‘आरसीसी’ ची ओळख निर्माण झालेली आहे. प्रतिवर्षीच्या निकालात नवनवीन विक्रम प्रस्थापित करणा-या ‘आरसीसी’ ने नीट- २०२१ मध्ये १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना देशातील नामांकित वैद्यकीय शिक्षण संस्था असलेल्या एआयआयएमएस, एमएएमसी आणि इतर नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला आहे. याचे संपूर्ण श्रेय हे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाला प्रा. मोटेगावकर सर आणि ‘आरसीसी’ टीमच्या मेहनतीला जाते.

‘आरसीसी’ चे उत्तम नियोजन, स्टडी मटेरियल, डीपीपी, नोट्स, विविध विषयांसाठी समर्पित असलेले दर्जेदार नोट्स या ‘आरसीसी’ च्या यशातील महत्वाचे भाग आहेत. दरम्यान, आगामी नीट परीक्षेच्या पार्श्वभूमीवर ‘आरसीसी’ ने ‘नीट टार्गेट-२०२३’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही स्कॉलरशिप एक्झामद्वारे ‘आरसीसी’ २००० विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणार आहे. ही स्कॉलरशिप एक्झाम दोन फेजमध्ये असणार आहे. यामध्ये फेज-१ ही ४ ऑगस्ट रोजी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम नीटच्या धर्तीवर असणार आहे आणि वेळ सकाळी २ ते .२० असेल.

या परीक्षेतून आपली गुणवत्ता सिद्ध केलेल्या विद्यार्थ्यांना ७ ऑगस्ट रोजी ऑफलाईन पद्धतीने होणा-या फेज-२ साठी निवड करण्यात येणार आहे. या परीक्षेतही परीक्षेचा अभ्यासक्रम फेज -१ प्रमाणेच राहील. फेज-२ झाल्यानंतर पात्र विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे त्यांना मिळलेली स्कॉलरशिप कळविली जाणार आहे. १३ ऑगस्ट पासून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्लास अनुभवता येतील. याशिवाय ३१ मार्चला संपूर्ण अभ्यासक्रम संपवला जाईल, असे काटेकोरपणे नियोजन ‘आरसीसी’ टीमने केले आहे. लिमिटेड बॅचेस असणार आहेत तरी लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

निशुल्क नोंदणी ६६६.१ूूस्रं३३ी१ल्ल.ूङ्मे ऑनलाईन तर प्रत्यक्ष कार्यालयातून ऑफलाईन पद्धतिने सुद्धा करता येईल. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही स्कॉलरशिप एक्झामद्वारे ‘आरसीसी’ २००० विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणार आहे. तरी यासाठी नोंदणी करणे आवश्यक असून नोंदणीसाठी ‘आरसीसी’ च्या लातूर कार्यालयासाठी ९०७५४०२२२२, नांदेड कार्यालय ९०७५३९२२२२ आणि औरंगाबाद कार्यालय ९१४५६४२२२२ किंवा ६६६.१ूूस्रं३३ी१ल्ल.ूङ्मे या वेबसाईटवर नोंदणी करता येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या