22.9 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeलातूरयंदाही गाळपास आलेल्या ऊसाला योग्य तो भाव देऊ

यंदाही गाळपास आलेल्या ऊसाला योग्य तो भाव देऊ

एकमत ऑनलाईन

रेणापूर : रेणा सहाकरी साखर कारखान्याने आजपर्यंत ऊस गाळपाची यशस्वी परंपरा कायम ठेवुन शेतक-यांना आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. या गळीत हंगामातही गाळपाचे उदिष्टे पूर्ण करुन गाळपास आलेल्या ऊसाला योग्य तो भाव देवु असे प्रतिपादन रेणा कारखान्याचे संस्थापक तथा माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी केली.

रेणापूर तालुक्यातील दिलीपनगर निवाडा येथील रेणा सहकारी साखर कारखाना सन २०२० -२१ मधील १५ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ दि. २२ ऑक्टोबर रोजी कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, आमदार धिरज विलासरावजी देशमुख यांच्या शुभहस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकुण करण्यात आला. त्याप्रसंगी सहकार महर्षी दिलीपराव देशमुख बोलत होते. यावेळी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन श्रीपतराव काकडे, माजी आमदार त्र्यंबक भिसे, रेणा कारखान्याचे माजी चेअरमन तथा संचालक आबासाहेब पाटील, जागृती कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मणराव मोरे, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, विलास कारखानयाचे व्हाईस चेअरमन रविंद्र काळे, श्री संत शिरोमणी मारोती महाराज कारखान्याचे व्हाईस चेअरमन शाम भोसले, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन.एस. आर देशमुख, जिल्हा बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाट, जिल्हा बँकेचे संचालक अ‍ॅड. प्रमोद जाधव, जिल्हा परीषद सदस्य सुरेश लहाणे, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख, कार्यकारी संचालक बी. व्ही.मोरे आदी मान्यवरांची उपस्थिती .

पुढे बोलताना सहकार महर्षी दिलीपराव देशमुख म्हणाले, कारखान्याच्या माध्यमातून विद्यमान गळीत हंगामात ५ लाख मे. टन ऊस गाळप उदिष्टे ठेवले असून ते उदिष्टे पुर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे. तसेच येणा-या काळात सौर उर्जा प्रकल्प ऊभारुन त्या माध्यमातून वीज निर्मीती केली जाईल व त्याबरोबरच ईथेनॉल निर्मीतीसाठी नवे तंत्रज्ञान वापरुन ऊसाच्या रसापासून ईथेनॉल निर्मीती करून शेतक-याना अधिकचा ऊस दर देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. विकासरत्न विलासराव देशमुख साहेबांनी विकासाचा जो मार्ग दाखवला आहे. त्या मार्गावर चालत मांजरा परीवारातील साखर कारखाने शेतकरी हिताची वाटचाल सुरु ठेवली. आम्ही राजकारण करत असताना विकासाचे राजकारण केले आकसाचे नाही. यापूढेही सर्वांना सोबत घेवुन जिल्ह्याला पुढे घेवुन जायचे आहे. तुम्ही स्वप्न पहा आम्ही ते साकार करु संकटाना घाबरु नका बँक व कारखाने आपल्या पाठीशी खंबीर पणे उभे आहेत, असा विश्वास त्यांनी दिला.

महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामीण भागातील सर्वांगीन विकासासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी नमुद करुन लातूर ग्रामीण मतदारसंघाच्या सर्वागीण विकासासाठी आपण कटिबध्द असून जे काही नवे आहे ते या मतदार संघात आणण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कोरोना आजार पुर्णपणे संपुष्टात आला नसल्याने नागरीकांनी योग्य ती काळजी घ्यावी. कोरोनावर नियत्रण मिळवण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलीस कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले.

प्रास्तावीकपर भाषणात रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे म्हणाले, रेणा कारखाना सर्वाधीक भाव ऊसाला देत असल्याने जो विश्वास शेतक-यांच्या मनात निर्माण झाला आहे. तो विश्वास सार्थ ठरवत कारखान्याचे मार्गदर्शक माजी मंत्री दिलीपराव देशमुख, पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात व संचालक मंडळाच्या सहकार्याने रेणा कारखाना चालू गळीत हंगाम यशस्वी करणार आहे. त्यामुळे गाळपासाठी रेणा कारखान्याकडे मोठया प्रमाणात ऊस द्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमास लातूर पंचायत समीतीचे उपसभापती प्रकाश उपाडे, जिल्हा बँकेचे संभाजी सुळ, संचालीका स्वयंमप्रभा पाटील, शिवकन्या पिंपळे तसेच इंदुताई इगे, चांदपाशा इनामदार, प्रताप पाटील यांच्यासह संचालक धनराज देशमुख, संजय हरीदास, संग्राम माटेकर, प्रेमनाथ आकणगीरे, प्रविण पाटील, संभाजी रेड्डी, शहाजीराव हाके, संचालीका वैशालीताई माने, अमृताताई देशमुख, तज्ज्ञ संचालक अनील कुटवाड, माजी संचालक स्नेहलराव देशमुख, पंडित माने, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा कारखान्याचे कार्यकारी संचालक रनवरे, जागृती कारखान्याचे प्रकल्प व्यवस्थापक सुनील देशमुख, रेणा कारखान्याचे खातेप्रमुख, कर्मचारी व शेतकरी सभासदांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सचीन सुर्यवंशी यांनी केले तर आभार व्हाईस चेअरमन अनंतराव देशमुख यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

शेतक-यांनी पाण्याची बचत करुन नवा आदर्श निर्माण करावा
सुदैवाने विद्यमान वर्षी पाऊस चांगला झाला असल्याने पाणी साठाही मुबलक प्रमाणात उपल्ब्ध आहे. या पाण्याचे योग्य नियोजन करुन शेतक-यांनी पाणी बचतीवर भर देत तुषार व ठिबक संचाचा वापर करुन पीकांना पाणी द्यावे. सध्या कमी पाण्यात व कमी क्षेत्रात अधिक उत्पन्न घेण्याची गरज बनली आहे. कारखान्याचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेबांचे सहकार क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. ज्या उद्देशाने विकासरत्न विलासराव देशमुख व दिलीपराव देशमुख यांनी जिल्ह्यात सहकार चळवळ रुजवली त्या उद्देशास डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल सुरु व पुढे सुरु राहणार आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना रेणा कारखाना परीसरात स्पर्धा परीक्षा केंद्र व आभ्यासीका सुरु केली असून त्या माध्यमातून सामाजीक दायित्व पार पाडण्याची भुमीका संचालक मंडळाची आहे, असे आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले.

हालकी गावात बहरली झेंडूफुलांची शेती

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या