24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeलातूरजिल्हा बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना धमक्या

जिल्हा बँकेच्या अधिकारी व कर्मचारी यांना धमक्या

एकमत ऑनलाईन

लातूर : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमचे फॉर्म का ? रद्द झाले बेबाकी प्रमाणपत्र दिले नाही असा कांगावा करून जिल्हा बँकेच्या मुख्यालयात टिळक नगर येथे भाजपाचे आमदार रमेश कराड, अरविंद पाटील निलंगेकर यांच्यासह ५० पदाधिका-यांनी सोमवारी बँकेत येवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत केला. तसेच उपस्थित बँकेच्या अधिकारी, कर्मचारी यांना अरेरावीची भाषा करत दमदाटी करून दहशत माजवन्याचा प्रयत्न केला असून जिल्हा बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. झालेल्या प्रकाराचा जिल्ह्यातील शेतकरी सभासद, संस्था चेअरमन नागरिकांकडून निषेध करण्यात येत आहे.

सोमवारी जिल्हा बँकेच्या मुख्यालयात भाजपाचे आमदार रमेश कराड, अरविंद पाटील निलंगेकर, भगवान पाटील तळेगावकर, प्रदीप पाटील खंडापुरकर, धर्मपाल देव शेटे, भरत चामले, बाबु खंदाडे, बाळासाहेब घुले, गोविंद नरहरे, रावसाहेब मुळे, अनिल भिसे, सौ कावळे, सौ पुरी, सौ कदम व ईतर भाजपाचे पदाधिकारी यांनी कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांच्या कार्यालयात येवून दमदाटी व उपस्थित अधिकारी कर्मचा-यांना धमक्या दिल्या बँकेच्या कार्यालयात जावून कागदपत्रे देण्याची मागणी केली. तसेच उपस्थित भाजपाच्या पदाधिक-यांनी दहशत पसरवीत अरेरावी केली. या घटनेचा जिल्ह्यातील शेतकरी सभासद, संस्था, चेअरमन यांच्याकडून करण्यात आला आहे.

याप्रकरणी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक हणमंत जाधव यांनी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संबंधितावर कडक कारवाई करावी, अशी मागणी बँकेच्यावतीने निवेदनात नमूद केली आहे, याची एक प्रत जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक, शिवाजी नगर पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिस अधिक्षक लातूर व जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर जिल्हा बँकेचे चेअरमन अँड. श्रीपतराव काकडे, व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे संचालक एन. आर. पाटील, अँड. प्रमोद जाधव, मारोती पांडे, गोविंद भोपनिकर जयेश माने, व्यंकटराव पाटील, अँड. राजकुमार पाटील, अँड. युवराज जाधव, आबासाहेब पाटील, अनुप शेळके, सौ सपना किसवे, सौ अनिता केंद्रे, सौ स्वयंप्रभा पाटील यांच्या स्वाक्ष-या आहेत.

चांगल्या संस्थेला बदनाम करण्याचा भाजपकडून प्रयत्न
राज्यात अग्रेसर असणा-या जिल्हा बँकेला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असून अर्जदार यांनी मागणी केल्याप्रमाणे त्यांना बेबाकी पूर्तता करण्यात आली असून अधिका-यांना दमदाटी करून खोटे प्रमाणपत्र मिळवण्याचा प्रयत्न करून बँकेत दहशत मजवण्याचा प्रयत्न केला आहे. या गुंडशाही घटनेचा आम्ही निषेध करतो, असे चेअरमन अँड. श्रीपतराव काकडे यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या