लातूर : कोरोना विषाणूच्या नियंत्रणासाठी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सुरु केली आहे. या मोहिमेत जिल्हयातील ३ लाख ३५ हजार ४१४ कुटंूबातील १७ लाख २९ हजार ४२४ नागरीकांची ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ या पथकाकडून आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. कोरोनाची लक्षणे आलेल्या व गंभीर व्यक्तींना अधिक उपचारासाठी संदर्भ सेवा देण्यात आली आहे.
लातूर जिल्हयात कोरोनावर नियंत्रण करण्यासाठी दि. १५ सप्टेंबर पासून ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन लातूर जिल्हा परिषदेच्या १ हजार ३५९ आरोग्य पथकातील ४ हजार ७७ कर्मचा-यांकडून कुटुंबातील प्रत्येक सदस्याची आरोग्य तपासणी केली जात आहे. आरोग्य विभागाच्या टिमकडून नारीकांचे तापमान, ऑक्सजन तपासला जात आहे. उपचार व संदर्भ सेवेकरीता २७२ डॉक्टरांची निवड केली आहे. तसेच संशयीत व्यक्तींना घेवून जाण्यासाठी ४८ अॅब्यूलंन्सही धावत आहेत. आरोग्य विभागाच्या पथकाकडून कोविडबाबत प्रबोधनही केले जात आहे.
आरोग्य विभागातील टिमला ३ लाख ४२ हजार २०१ कुटंूबातील १८ लाख ६६ हजार ९१० नागरीकांची आरोग्य तपासणी करण्याचे उदिष्ट दिले असून आजपर्यंत लातूर जिल्हयातील ३ लाख ३५ हजार ४१४ कुटंूबातील १७ लाख २९ हजार ४२४ नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या आरोग्य तपासणीत ३ हजार ४७० नागरीकांना कोरोनाची लागण झाल्याचे लक्षणे दिसून आली. ७४२ नागरीकामध्ये सारीच्या आजाराचे लक्षणे दिसून आली. तसेच ४८ हजार ४४१ नागरीकांना डायबेटिझ, बी.पी., -हदयरोग, किडनीचे आदी आजार असल्याचे तपासणी दिसून आले. या बरोबरच इतर अशा आजाराच्या ६३ हजार ३९९ नागरीकांना संदर्भ सेवा देवून अधिक उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्र, जिल्हा उपरूग्णालय, जिल्हा रूग्णालय येथे पाठवण्यात आले.
मृत्यूदर रोखण्यासाठी प्रयत्न
जिल्ह्यात कोरोना विषाणूचे नियंत्रण करण्यासाठी व होणारे मृत्यूदर कमी करण्यासाठी लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नेमण्यात आलेल्या आरोग्य पथकाकडून नागरीकांची दररोज तपासणी केली जात आहे. त्यासाठी नागरीकांनीही फिजीकल डिस्टंन्स पाळले पाहिजे. नाकाला व तोंडाला मास्क लावला पाहिजे. बाहेर फिरून आल्यानंतर सतत हात धुणे गरजेचे आहे. नागरीकांनी गरज नसताना गर्दीत जाणे टाळावे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. मोनिका पाटील, डॉ. संतोष हिंडोळे यांनी केले आहे.
१४ ऑक्टोबरपासून दुसरा टप्पा लातूर जिल्हयात कोरोनाला रोखण्यासाठी दोन टप्यात ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम लातूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून राबण्यात येणार आहे. पहिला टप्पा दि. १५ ऑगस्ट ते १० ऑक्टोबर असून दुसरा टप्पा हा दि. १४ ते २४ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे नवीन १०२ रुग्ण