26.5 C
Latur
Friday, December 9, 2022
Homeलातूरघरफोडीतील आरोपींकडून साडेतीन लाखांचा मुद्देमाला जप्त

घरफोडीतील आरोपींकडून साडेतीन लाखांचा मुद्देमाला जप्त

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
घरफोडीतील आरोपींकडून, चोरीस गेलेली रोख रक्कम ३ लाख १२ हजार व पाच मोबाईल असा ३ लाख ६५ हजार रुपयाचा मुद्देमाला जप्त करण्यात आला आहे. सदर कामगिरी विवेकानंद चौक पोलिसांनी केली आहे. पोलीस ठाणे विवेकानंद हद्दीतील आयोध्या कॉलनी येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन कपाटात ठेवलेली रोख रक्कम ३ लाख ७५ हजार रुपये चोरून नेल्या प्रकरणी विवेकानंद चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा आढावा घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी निर्देशित करून महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस पथक नेमुन तपासा बाबत सूचना व मार्गदर्शन केले होते.

तपास पथकाला मिळालेल्या माहितीवरूनअक्षय राम तेलंगे (२२ रा. गोपाळ नगर, लातूर), योगेश उर्फ शक्ती अशोक गुरणे (२५ रा. माताजी नगर, लातूर) या दोन आरोपींना ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुल केले. गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम ३ लाख १२ हजार रुपये व चोरी केलेल्या रक्कमेतून खरेदी केलेला १३ हजार ५०० रूपयांचा मोबाईल तसेच इतर ठिकाणाहून चोरी केलेले अंदाजे ४० हजार रुपये किमतीचे चार मोबाईल आरोपींच्या कबुली वरून गुन्हयात जप्त करण्यात आले आहेत. गुन्ह्यातील उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया सुरू असून सध्या दोन्ही आरोपी ८ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मध्ये आहेत. गुन्ह्याचा तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील सपोनि भाऊसाहेब खंदारे हे करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या