24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeलातूरतीन दुचाकीसह तिघांना अटक

तीन दुचाकीसह तिघांना अटक

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
स्थानिक गुन्हे शाखा लातूरच्या पथकाने तीन चोरटयांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३ मोटर सायकल आणि एका मोटर सायकलचे सुटे भाग असा १ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमध्ये दोन गुन्हे उघड झाले आहेत. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग जैन, लातूर शहरचे डीवायएसपी जितेंद्र जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा लातूरचे सपोनि राहुल बहुरे, सपोनि सचिन द्रोणाचार्य, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिलापटे, नवनाथ हसबे, राजाभाऊ मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, संतोष खांडेकर, नकुल पाटील यांच्या पथकाने रहीम सुलेमान शेख वय २२, बालाजी नागनाथ भोळे वय ३५, अमन उर्फ नोमान एजाज पठाण वय २१ सर्व रा. रेणापूर येथील असून या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३ मोटर सायकल, आणि साहित्य असा १ लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या कार्यवाही मध्ये पोलीस स्टेशन रेणापूर येथील दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या