22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeलातूरकिनगांव येथील तीन दुकाने आगीत जळून खाक

किनगांव येथील तीन दुकाने आगीत जळून खाक

एकमत ऑनलाईन

किनगांव : अहमदपूर तालुक्यातील किनगांव येथील सावरकर चौकाजवळ किनगांव मेन रोडवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या समोरच्या बाजूस असलेले चार दुकानांना मंगळवारी रात्री साङे आठच्या दरम्यान विद्युत प्रवाहाच्या शॉर्ट सर्कीटने आग लागून भस्मसात झाली. यात व्यापा-यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे संबधित व्यापा-यांचे म्हणणे आहे.

यात हाफीज शुकुरसाब मोमीन यांची अब्दुल शुकुर मशीनरी स्टोअर्स याचे एकूण ६८ लाख, नसीर शुकुरसाब मोमीन यांची सिमरण इटरप्रायजेस/फर्नीचर व मोबाईल शॉपी यांचे २८ लाख,गियासोद्दीन शुकुरसाब मोमीन यांची न्यु अब्दुल शुकुर जनरल स्टोअर्स याचे २० लाख तर शेख शफीक बशीरसाब यांची न्यु बालाजी क्लॉथ सेटंर यांचे १० लाखाचे असे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. यातील एका दुकानात आग लागली. माञ अहमदपूर येथील अग्निशमन दलाची गाङी येईपर्यंत आगीने रौद्र रूप धारण करून तीनही दुकाने कवेत घेतले.

चौथ्या कापङाचे शोरूम ला आग लागली तो पर्यत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली ही घटना.४ मे रोजी राञी साङेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्ट सर्कीट होउन आग लागली.असल्याचे सांगितले जाते.आग मोठ्या प्रमाणात असल्याने तीन तासांनंतर आग आटोक्यात आली.या घटना स्थळी आमदार बाबासाहेब पाटील,संरपच किशोर मुंडे,अहमदपूर नगरपरिषदेचे नगरसेवक सय्यद मुन्ना यांनी भेट दिली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाङ,सहायक पोलिस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे यांनी ही घटनास्थळी धाव घेतली. बुधवारी सकाळी मंडळ अधिकारी सोपान दहिफळे, तलाठी हसंराज जाधव यांनी जळालेल्या दुकानाचा पंचनामा केला. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे व्यापा-यांनी तहसीलदारांंना दिलेल्या अर्जात म्हटले आहे.

बीपी,शुगर,दमा,हार्टचे गंभीर आजार असणा-या वयोवृद्धांच्या जीवाशी खेळ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या