31.9 C
Latur
Monday, January 25, 2021
Home लातूर ‘शाहू’चे तीन विद्यार्थी राज्यात प्रथमच्या यादीत

‘शाहू’चे तीन विद्यार्थी राज्यात प्रथमच्या यादीत

एकमत ऑनलाईन

लातूर : कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये १ ते २० ऑक्टोबरदरम्यान सीबीटी पद्धतीने ३२ सत्रांमध्ये झालेल्या परीक्षेत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी २०२० परीक्षेत येथील राजर्षी शाहू महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा यशाचा नवीन अध्याय लिहीला आहे. यावर्षी पहिल्यांदाच पीसीबी व पीसीएम या दोन ग्रुपसाठी वेगवेगळी परीक्षा घेण्यात आली. तसेच विद्यार्थांना गुणवत्ता क्रमांक देखील देण्यात आलेले नाहीत. शाहू महाविद्यालयातील २९० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली होती. पीसीबी गटातून महाराष्ट्रातून एकुण १९ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल गुण प्राप्त झाले आहेत. त्यातील सहा विद्यार्थी मराठवाड्यातील असून तीन विद्यार्थी एकट्या शाहू महाविद्यालयाचे आहेत.

पीसीबी गटात १०० पर्सेंटाईल गुण मिळवणा-या या महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थ्यांमध्ये केदार जयंत डुमणे, अभय अशोक चिल्लरगे, प्रणव रामलिंग तत्तापूरे यांंचा समावेश आहे. पीसीबी गटातून उपलब्ध एकुण ४० विद्यार्थ्यांच्या निकालापैकी ८ विद्यार्थांना ९९ पेक्षा अधिक पर्सेंटाईल तर ९८ पेक्षा अधिक पर्सेंटाईल गुण असणारे १३ विद्यार्थी आहेत. अभियांत्रिकी (पीसीएम) गटातून आनंद बालाजी पाटील हा विद्यार्थी ९९.९७ पर्सेंटाईलसह महाविद्यालयात प्रथम, सुजित नारायण कांबळे हा विद्यार्थी ९९.९४ पर्सेंटाईलसह महाविद्यालयात दुसरा तर मयुर मनोज जगळपूरे हा विद्यार्थी ९९.९२ पर्सेंटाईलसह तिसरा आला आहे.

पीसीएम गटातून उपलब्ध १८४ विद्यार्थ्यांच्या निकालापैकी २५ विद्यार्थी ९९ पर्सेंटाईल पेक्षा अधिक गुण प्राप्त झालेले आहेत. ९८ पर्सेंटाईलचे ४३, ९७ पर्सेंटाईलचे ६८, ९६ पर्सेंटाईलचे ८६, ९५ पर्सेंटाईचे १०० तर ९० पेक्षा अधिक गुण प्राप्त झालेले १३५ विद्यार्थी आहेत. या अद्वितीय यशासाठी शिव छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. गोपाळराव पाटील, उपाध्यक्ष डॉ. पी. आर. देशमुख, सचिव प्राचार्य अनिरुद्ध जाधव, सहसचिव अ‍ॅड. किशनराव सोनवणे, गोपाळ शिंदे सर्व संचालक, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, प्राचार्य बी. एम. मैंदर्गे, सीईटी सेल विभागाचे संचालक प्रा. डी. के. देशमुख, मुख्य समन्वयक प्रा. सतीश पवार, अ‍ॅडव्हान्स बॅचचे समन्वयक प्रा. विनोद झरीटाकळीकर, पर्यवेक्षक प्रा. एस. आर. बिराजदार, प्रशासकीय समन्वयक प्रा. श्रीहरी तलवारे, समन्वयक अभयसिंह देशमुख, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले.

आले विभागीय आयुक्तांच्या मना… तेथे कोणाचे चालेना

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या