शिरूर अनंतपाळ : तालुक्यातील चार ग्रामपंचायत निवडणुकींची रणधुमाळी सुरु झाली आहे. यात एक ग्रामपंचायत बिनविरोध निघाली असून तीन गावांत पावसाळ्यातच निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकीत ४ ऑगस्टला मतदान तर ५ ऑगस्टला मतमोजणी होणार असून स्थानिक नेत्यांचा या निवडणुकीत कस लागणार आहे.
तालुक्यातील मुदत संपलेल्या चार ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून यात तुरुकवाडी, आनंदवाडी,नागेवाडी व हणमंतवाडी या चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यातील हणमंतवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे. तुरुकवाडी, आनंदवाडी व नागेवाडी या तीन ग्रामपंचायतीत दुरंगी लढती रंगणार असून पावसात राजकीय वातावरण तापणार आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तुरुकवाडी येथील तीन प्रभागात ७ जागांसाठी १४ उमेदवार ंिरगणात आहेत.आनंदवाडी गावांतील तीन प्रभागात ७ जागेसाठी १६ उमेदवार ंिरगणात असून यात २ अपक्षांनीही उडी घेतली आहे.
नागेवाडी येथील तीन प्रभागात ७ जागांसाठी १२ उमेदवार ंिरगणात उतरले आहेत. तर हणमंतवाडी ग्रामपंचायत बिनविरोध निघाली आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार १९ जुलै नामनिर्देशनपत्र सादर करण्याची शेवटची तारीख होती.२० जुलै रोजी अर्जाची छाननी, छाननीत राहिलेल्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत २२ जुलै पर्यंत असणार आहे. त्याच दिवशी २२ जुलै रोजी दुपारी तीन नतर उमेदवारांना निवडणूक चिन्ह देणे आणि उमेदवारांची अंतीम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रत्यक्ष मतदान ४ ऑगस्ट रोजी होणार असून ५ ऑगस्ट रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे.