23 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूररास्तभाव धान्य दुकानदारांचे तहसिलसमोर धरणे

रास्तभाव धान्य दुकानदारांचे तहसिलसमोर धरणे

एकमत ऑनलाईन

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुका रास्त भाव धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधाक संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी सोमवारी तहसील कार्यालयावर एक दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्ली व अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार महासंघातर्फे केलेल्या नियोजनानुसार हे आंदोलन करण्यात आले असून यापुढे टप्प्याटप्प्याने दिल्लीपर्यंत आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष उमाकांत बोळेगावे यांनी सांगितले.

भारत सरकारच्या वत्ति मंत्रालयाद्वारे गठीत केलेल्या वश्वि खाद्य कार्यक्रम अंतर्गत त्यांच्या रिपोर्टवर ४४० रुपये कमीशन प्रतिकिं्वटल देण्यात यावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. यावर भारत सरकार द्वारा टोलवाटोलवी करण्यात येत आहे. भारत सरकारच्या वतीने हॅण्डलींग लॉस सर्व राज्यामध्ये लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्र दिल्यावरही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.या सर्व बाबी लक्षात घेता ८ जून रोजी दिल्ली येथे झालेल्या बैठकीमध्ये देश पातळीवर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यास राष्ट्रीय कार्यकारीणीने व सर्व राज्यांच्या प्रतिनिधींनी सहमती दर्शविली आहे.

या आंदोलनात परवानाधारक दुकानदारांना प्रतिकिं्वटल ४४० रुपये कमिशन द्यावेकिंवा दरमहा ५० हजार रुपये मानधन द्यावे, साखर तसेच गहू, तांदूळ यांसारखे धान्य हाताळणी करीत असताना प्रतिकिं्वटल एक किलो तूट ग्रा धरावी, रेशन कार्डवर असलेल्या एलपीजी सिंिलडर विक्रीसाठी परवानगी देऊन त्यावर निश्चीत कमिशन द्यावे, धान्य प्लास्टिकच्या गोण्यांऐवजी ज्यूटच्या बारदानातून द्यावे, कोरोनात मृत्युमुखी पडलेल्या परवानाधारकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देऊन कोरोना योध्दा म्हणून घोषित करावे, केंद्र सरकारने वाढवलेली २० व ३७ रुपये कमिशनची रक्कम तत्काळ अमलात आणावी, ग्रामीण भागातील दुकानदारांना गहू, तांदूळ, भरड धान्य खरेदी करण्याची परवानगी द्यावी, आदी मागण्याचे निवेदन तहसीलदार अतुल जटाळे यांच्याकडे देण्यात आले.

या आंदोलनात रास्त भाव दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष उमाकांत बोळेगावे, उपाध्यक्ष एस.एम. पटणे, सचिव नारायण जाधव, सहसचिव कल्याणराव बरगे, कोषाध्यक्ष प्रकाश माडे, माजी अध्यक्ष शाम शिंदाळकर, उपाध्यक्ष अंकुश येडले, सदस्य हणुमंत चव्हाण, नारायण नाळापुरे, सरोजाबाई गायकवाड,महेश बोळेगावे,बालाजी सांडगे, गोंिवद बन यांच्यासह तालुक्यातील सर्व परवानाधारक रास्त भाव धान्य दुकानदार उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या