25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeलातूरआज ‘आमने सामने’चा नाट्यप्रयोग

आज ‘आमने सामने’चा नाट्यप्रयोग

एकमत ऑनलाईन

लातूर : ऑल इंडिया लिनेस क्­लब एमएच-५ हिकरणीच्या वतीने हिरकणीच्या प्रांतपाल लि. प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांच्या पुढाकारातून आज दि. ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता येथील मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख स्मृती सभागृहात ‘आमने सामने’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आह.

‘आमने सामने’ या या नाटकामध्ये कांदे-पोहे, ठिपक्याची रांगोळी या मालिकेतील लिना भागवत आणि मंगेश कदम यांचा सहज व सुंदर अभिनय आणि प्रेक्षकांशी केलेला थेट संवाद आपल्याला पहायला मिळणार आहे. तसेच ‘होणार सून मी या घरची’ या सारख्या अनेक मालिकांतून गाजलेला रोहन गुज्जर आणि केतकी पालव या तरुणाईने त्यांना उत्तम साथ दिलेली आहे. ‘आमने सामने’ या नाटकाचा परदेशातील एनआरआयच्या आग्रहाखातर बृहन्महाराष्ट्र महामंडळाच्या अधिवेशनात आमने सामने या नाटकाचा प्रयोग अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये पार पडला महाराष्ट्राबरोबरच प्रदेशातही या नाटकाचे कौतुक झाले. या नाट्यप्रयोगाचा लाभ घेण्यासाठी ऑल इंडिया लिनेस क्­लब एमएच-५ हिरकणीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन सौ. प्रतिभाताई पाटील कव्हेकर, मल्टिपल सेक्रेटरी-ट्रेजर डिस्ट्रिक्टच्या सचिव लि. अर्चना नलावडे, लि. साधना पळसकर, लि. उमा मिरजगावे आदींनी केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या