21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeलातूरबसस्थानकात प्रसाधनगृह,चौकीची औपचारिकताच

बसस्थानकात प्रसाधनगृह,चौकीची औपचारिकताच

एकमत ऑनलाईन

निलंगा : येथील बस स्थानकामधील प्रसाधन गृह व नवालाच असलेली पोलिस चौकी तात्काळ सुरु करण्यात यावी अन्यथा येत्या १० व्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा निलंगा युथ मार्फत उपविभागीय अधिका-यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे

निलंगा येथील नवीन इमारतीच्या बाँधकामाचे कारण दाखवत सुरळीतपने चालू असलेले जुने प्रसाधन गृह तोड़ण्यात आले आहे. नवीन इमारतीचे काम गेल्या अनेक महिन्यापासून रखडले आहे .यामुळे नागरिकांची प्रचंड Þगैरसोये होत आहे. पुरुष लघुशंकेसाठी भिंतीचा अडोसा घेत असले तरी माहिलांची मोठी अडचण होत आहे . याचाच फायदा काही आंबट शौकीन लोक घेत आहेत यामुळे शहराची प्रतिमा मलीन होत आहे .स्थानकातील पोलीस चौकी नवालाच असून ती बंद असते. यामुळे महिला व मुलींंचा छळ होत आहे. शिवाय चोरीच्या घटना वाढल्या आहेत. तसेच नवीन बाँधकामाच्या ठिकाणी नको ते धंदे चालू आहेत अशा घटनांना आळा बसविण्यासाठी पोलिस चौकी कायम चालू करण्यात यावी व महिला पोलीस कर्मचा-यांंची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी निलंगा युथ माÞर्फत करण्यात आली आहे. या मागण्या येत्या दहा दिवसात पूर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी जाबाबदार प्रशासन राहील असा उल्लेख केला आहे.

या निवेदनावर मुजीब सौदागर, मेघराज जेवळीकर,दत्ता मोहोळकर,महेश ढगे, राणा आर्य,शरद पेठकर,सबदर कादरी,हीरा कादरी,अमोल सूर्यवंशी, नीलेश गायकवाड़,बाबा शेख,संतोष तुगावे,चेतन मोहोळकर,अतुल सोनकांबळे,राम मदने, योगेश कांबळे, विशाल खलसे,अजय ढ़वळे,प्रतीक शेळके,जफर हाशमी,दगड़ू चौधरी, मोइज काझी यांच्यासह युवकांच्या स्वाक्ष-या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या