27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeलातूरबहूजन वंचित आघाडीतर्फे उद्या मोेर्चा, धरणे

बहूजन वंचित आघाडीतर्फे उद्या मोेर्चा, धरणे

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
प्रेषित मोहंमद पैगंबर यांच्या विषयी अपमानास्पद वक्तव्य करणा-या भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी बहुजन वंचित आघाडीच्या वतीने उद्या दि. १७ जून रोजी दुपारी २.३० वाजता मोर्चा व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती बहूजन वंचित आघाडीचे संतोष सूर्यवंशी, जगदीश माळी,
हमीद शेख व सय्यद सलीम यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील गंजगोलाई परिसरातील मस्जिद रोडवरुन हा मोर्चा निघणार आहे. मोर्चा गंजगोलाईतून साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे चौकात पोहोचल्यानंतर तेथे मोर्चाचा समारोप होऊन धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्यादरम्यान शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे. भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी जी गरळ ओकली ती भाजपाचा मनुवादी चेहरा स्पष्ट करणारी आहे. नुपूर शर्मा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेस डॉ. विजय अजनीकर, सुजाता अजनीकर, मंजूषा निंबाळकर, मजहर पटेल, आदी उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या