26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरलातूर शहरात प्लास्टिकला पुर्णत: बंदी

लातूर शहरात प्लास्टिकला पुर्णत: बंदी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने प्लॅस्टिक, सिंगल यूज प्लॅस्टिक याच्यावर पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे. प्लॅस्टिकचा वापर करणा-या व्यापा-यांवर कार्यवाही करण्यात येणार आहे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने १२ ऑगस्ट २०१२ रोजी अधिसूचना क्रमांक जी. एस. आर. ५७१(ए) जारी केला आहे, ज्याद्वारे सिंगल यूज प्लॅस्टिक (एसयुपी) वस्तूंचे उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर करण्यास १ जुलै २०२२ पासून मनाई करण्यात आली आहे तसेच प्लॅस्टिक वेस्ट मॅनेजमेंट (पीडब्ल्युएम) नियम २०१६ चे नियम ४(२) (सुधारित केल्यानुसार), पॉलिस्टीरिन आणि विस्तारित पॉलिस्टीरिन, वस्तूंसह खालील एकदा वापराच्या प्लास्टिक (एसयुपी) वस्तूंचे उत्पादन, आयात, साठा, वितरण, विक्री आणि वापर १ जुलै २०२२ पासून प्रतिबंधित केले आहे अश्या प्रकारचे प्लॅस्टिक वापर करणा-या नागरिकांना दंडात्मक कारवाई होणार आहे, असे आदेश लातूर शहर महानगरपालिका आयुक्त यांच्या तर्फे देण्यात आले आहेत.

यामध्ये एकदा वापरुन टाकून देण्यात येणारे प्लॅस्टिक, १०० मायक्रोन जाडीपेक्षा कमी जाडी असलेले प्लॅस्टिक यांचा समावेश आहे. तसेच, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काड्या, प्लास्टिकचे ध्वज, कँडी स्टिक्स, आइस्क्रीम स्टिक्स, थर्मोकोलसजावटीसाठी, शहरातील समारंभात वापरले जाणारेप्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे की काटे, चमचे, चाकू, ट्रे, मिठाईच्या पेट्यांभोवती, निमंत्रण पत्रिका आणि सिगारेटची पाकिटे, पीव्हीसी बॅनर, स्टिरर सर्व प्रकारच्या प्लास्टिक पिशव्या (कॅरी बॅग), कंपोस्टेबल प्लास्टिक (कचरा आणि नर्सरी पिशव्या वगळून), न विणलेल्या कॅरी बॅग (पॉलीप्रॉपिलीनपासून बनवलेल्या) यांचा वापर व विक्री करणा-यास रुपये ५००० ते २५००० दंडात्मक कार्यवाही होऊ शकते.

या संदर्भात शहरातील सर्व उत्पादक, स्टॉकिस्ट, किरकोळ विक्रेते दुकानदार, ई-कॉमर्स कंपन्या, रस्त्यावरील विक्रेते, व्यावसायिक आस्थापने (मॉल्स, बाजारपेठ, शॉंिपग सेंटर्स, सिनेमा घरे, पर्यटन ठिकाणे, शाळा, कॉलेज, ऑफिस कॉम्प्लेक्स, रुग्णालये आणि इतर) यांना, एसयुपी वस्तूंचे उत्पादन, साठा, वितरण, विक्री आणि वापर थांबवणे याबाबत आयुक्त लातूर शहर महानगरपालिका आवाहन करण्यात आले आहे. तसेच दि. २५ जुलै २०२२ रोजी ११.३० सकाळी शहरतील प्लॅस्टिक वापर करणारे व्यापारी याची जनाजागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ सोबत हरकती व पर्यायी उपाय योजना बैठक आयोजित केली आहे.
फोटो: ६

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या