23.2 C
Latur
Wednesday, June 16, 2021
Homeलातूरतौत्के चक्रीवादळाचा फटका; विजेचा लपंडाव

तौत्के चक्रीवादळाचा फटका; विजेचा लपंडाव

एकमत ऑनलाईन

लातूर : महाराष्ट्रात ‘तौत्के’ या चक्रीवादळाचे संकट घोंघावत आहे. त्याचा फटका लातूर जिल्ह्याला काही प्रमाणात बसला आहे. शनिवारी सायंकाळी लातूर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वा-यासह पावसाला सुरुवात झाली. त्यात विजेच्या लपंडावाने तर नागरिकांची परिक्षाच घेतली. बाहेर पाऊस घरातील वीज गुल, अशा विचित्र परिस्थित रात्र जागुन काढावी लागली.

तज्ञांनी वर्तविलेल्या अंदाजानूसा तौत्कके चक्रीवादळाच्या तडाख्यापासून लातूर जिल्हा तसा कोसो दुर. त्यात या चक्रीवादळाचा रोख हा गुजरात, दमण-दिवू आणि दादार-नगर हवेलीच्या दिशेने असला तरीसुद्धा लातूर जिल्ह्यात या चक्रीवादळाचा परिणाम जाणवला. शनिवारी संपूर्ण दिवसभर चटक उन्ह होते. उन्हाचा पारा चढल्याने जिवाची लाहीलाही होत होती. सायंकाळी अचानक आभाळात ढगांची गर्दी झाली आणि वादळी वा-यासह पावसाला सुरुवात झाली. पावसाचा मोठा सडाका आला आणि पाऊस थांबला. त्यानंतर मात्र घामाच्या धाराच निघाल्या. रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. बराच वेळ पाऊस पडला. या वादळी वा-यासह पावसाचा जबरदस्त तडाखा बसला नसला तरी काही ठिकाणी झाडं उलमडून पडली. विजेचे खांब वाकले.

तौत्के चक्रीवादळाचा प्रभाव रविवारीही राहील. मुसळधार पाऊस कोसळू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानूसार रविवारी दुपारनंतर हवामानात अचानक बदल झाला. पाहता पाहता आकशात ढगांची गर्दी झाली. तळपणारा सूर्य ढगाआड गेला. पावसाची भुरभूर झाली. वादळी वारा मात्र कायम होता. तौत्के चक्रीवादळाचे संकट महाराष्टावर घोंघावत असल्याचा परिणाम लातूर जिल्ह्यात जाणवत आहे. वादळी वा-यासह पावसाचा जबरदस्त तडाखा बसला नसला तरी बरेचशे नुकसान झाले आहे.

अर्धे लातूर अंधारात
तौत्के चक्रीवादळाचा शनिवारी रात्री लातूर जिल्ह्यात परिणाम जाणवला. शनिवारी सायंकाळी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी वादळी पावसाला सुरुवात झाली. अंतरा-अंतराने पावसाचा सडाका पडत होता. रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास लातूर शहरातील पूर्व भागातील विजपुरवठा खंडीत झाला. जवळपास अर्धे शहर अंधारात बुडाले. तीन तासांनंतर पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला. घराबाहेर पाऊस आणि घरातील वीज गुल, असा परिस्थित डासांचा त्रास यामुळे नागरिकांना रात्र जागुन काढावी लागली.

मान्सुनपूर्व कामांसाठी पुन्हा वीजपुरवठा बंद
तौत्के चक्रीवादळाचा परिणाम लातूर जिल्ह्यात दिसून आला. वादळी वा-यासह पाऊस पडल्याने शनिवारी रात्री वीजपुरवठा खंडीत झाला होता. रविवारीही सकाळी ११ वाजत शहराच्या पुर्व भागातील काही परिसर, गांधी चौकातील काही भागात तीन तास वीज पुरवठा बंद होता. महावितरणच्या युनिट-२ च्या क्षेत्रातील गांधी चौकातील झांडांच्या फांद्या तोडण्यासाठी वीजपुरवठा बंद करण्यात आल्याचे सहायक अभियंता एस. एन. पवार यांनी सांगीतले. विजेच्या तारांमध्ये आलेल्या झाडाच्या फांद्या महावितरणच्या वतीने कट करण्यात आल्या.

व्हेंटिलेटरवरील रुग्णांना जनरेटरचा आधार
तौत्के चक्रीवादळाचा प्रभाव शनिवारपासून जाणवत आहे. वादळी वा-यासह पावसामुळे वीजपुरवठा खंडीत होता आहे. मात्र गेल्या काही दिवसांत महावितरणच्या वीज पुरवठ्याची खात्री कोणालाच नाही. कधी वीज येईल आणि कधी गुल होईल, हे कोणीच सांगु शकत नसल्यामुळे सरकारी दवाखान्यासह खाजगी दवाखान्यातील कोविड सेंटरमधील व्हेंटिलेटरवरील रुग्णांच्या सोयीसाठी जनरेटर लावण्यात आलेले आहेत. शहरातील जवळपास प्रत्येक खाजगी दवाखान्यासमोर भाड्याचे जनरेटर उभे असलेले दिसून येत आहेत. शनिवारी रात्री तीन ते चार तास शहरातील पुर्व भागातील वीज पुरवठा गायब झाला होता त्यावेळी व्हेंटिलेटरवरील रुग्णांना जनरेटरचाच आधार मिळाला.

अंत्ययात्रेसाठी सोलापुरात जमली हजारोंची गर्दी; पोलीसही हतबल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या