24.2 C
Latur
Thursday, March 4, 2021
Home लातूर जळकोट तालुका कोरोना मुक्तीच्या दिशेने

जळकोट तालुका कोरोना मुक्तीच्या दिशेने

एकमत ऑनलाईन

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तालुक्याचे कोरोना मुक्तीच्या दिशेने पाऊल पडत आहे. तालुक्यात सद्यस्थितीत फक्त एकच कोरोना रुग्ण आहे, गत महिनाभरापासून जळकोटचे कोवीड केअर सेंटर रिकामे आहे. सप्टेंबर महिन्यापासून जळकोट तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. यामुळे ही एक जळकोट तालुक्यासाठी दिलासादायक बातमी आहे.

जळकोट तालुक्यामध्ये ४०९ जणांना कोरोनाची लागण झाली होती. यातील ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे तसेच ३९७ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलेले आहे, सद्यस्थितीत जळकोट तालुक्यात केवळ एकच रुग्ण अ‍ॅक्टिव आहे, त्याच्यावर इतर ठिकाणी उपचार सुरू आहेत. जळकोट तालुक्यात मार्च महिन्यामध्ये कोरोना महामारीमुळे लॉक डाऊन करण्यात आला होता अनेक महिने जळकोटची बाजारपेठ बंद होती, तालुक्­यात भीतीचे वातावरण होते. यानंतर जळकोट तालुक्यात जुलै तसेच ऑगस्ट महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. बघता तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या तीनशेच्यावर गेल्यामुळे आता जळकोट तालुक्यात रुग्णांची संख्या एक हजारच्या वर जाते की काय असे वाटत होते. परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये कोरोनाचा आलेख घसरत गेला. यानंतर जळकोटच्या कोवीड सेंटर मध्ये एकही रुग्ण दाखल नाही.

जळकोट तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हावे तसेच या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी तहसीलदार संदीप कुलकर्णी , तालुका आरोग्य अधिकारी संजय पवार , ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक जगदीश सूर्यवंशी, तत्कालीन तालुका आरोग्य अधिकारी प्रशांत कापसे गट विकास अधिकारी चंद्रहार ढोकणे या अधिका-यांनी विशेष प्रयत्न केले.

तसेच या सोबत नागरिकांना शिस्त लागावी नागरिकांनी मास्कचा वापर करावा यासाठी पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी आपल्या पोलिस समवेत वेळोवेळी नागरिकांना जाणीव करून दिली. यासोबतच वांजरवाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर भारती, आतनूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हरेश्वर सुळे, यांनीही आपल्या भागात कोणाच्या उच्चाटनासाठी काम केले.यांच्यासह ग्रामीण रुग्णालय जळकोट येथील डॉक्टर ओमकार कदम, डॉ किरण कुंठे, डॉ. खंडागळे यांनीही मोलाची भूमिका बजावली तसेच डॉक्टर सचीन सिद्धेश्वरे, डॉक्टर मतीन यांनी कोवीड सेंटर येथे आपली सेवा बजावली तसेच तालुक्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती, यांनीही कोरोना काळात आपली भूमिका बजावली. या सर्वांच्या प्रयत्नामुळे तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळे जळकोट तालुक्यात केवळ एक रुग्ण उपचार घेत आहे.

नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे
जळकोट तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी येणा-या काळात आणखीन कोरोना रुग्णांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केला आहे. यामुळे नागरिकांनी पूर्वी जशी काळजी घेत होते तशीच काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करावा, संशय आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
-डॉ. जगदीश सुर्यवंशी (अधीक्षक)
-डॉ . संजय पवार
(तालुका आरोग्य अधिकारी)

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या