26.2 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeलातूरट्रॅकिंगमुळे फाईलींच्या विलंबाला चाप

ट्रॅकिंगमुळे फाईलींच्या विलंबाला चाप

एकमत ऑनलाईन

लातूर : योगीराज पिसाळ
लातूर जिल्हा परिषदेत नागरीक, अधिकारी व कर्मचा-यांच्या माध्यमातून येणारे टपाल, फाईल, तक्रारी येतात. त्या वेळेत निकाली निघाव्यात या दृष्टीने लातूर जिल्हा परिषदेने प्रशासनाने फाईल ट्रॅकींग व टपाल ट्रॅकींग सुरू केल्याने फाईलींच्या विलंबाला चाफ लागणार आहे. नागरीक, अधिकारी व कर्मचा-यांच्याकडून कामांच्या संदर्भाने तक्रारी, फाईली लातूर जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील आवक-जावक विभागात दाखल होतात. अधिकारी व कर्मचारी आपल्या सोईनुसार फाईलींचा निपटारा करत होते.

त्यामुळे अनेक दिवस फाईलचा प्रवास चालत होता. त्यामुळे जिल्हा परिषदेने नागरीकांचे व अधिकारी, कर्मचा-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी टपाल ट्रॅकींग व फाईल ट्रॅकींग सुरू करण्यात आले. प्रशासन गतीमान करण्यासाठी, जि. प. कडे विविध माध्यमातून दाखल झालेले प्रश्न सोडवण्यासाठी लवकर निर्णय व्हावेत म्हणून १ जुलै पासून फाईल ट्रॅकींग कार्य प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या संदर्भाने कर्मचा-यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचारीच इतर कर्मचा-यांना आता प्रशिक्षण देत आहेत. त्यामुळे फाईलींचा निपटारा वेळेत होण्यास मदत होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या