32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home लातूर व्यापा-यांना आता लॉकडॉऊन बंधनकारक नको

व्यापा-यांना आता लॉकडॉऊन बंधनकारक नको

एकमत ऑनलाईन

रविकांत क्षेत्रपाळे अहमदपूर : कोरोना या महाभयंकर महामारीमुळे व्यापा-यांंना आपले व्यवहार सतत बंद करावे लागले आहेत. सहा महिन्यांपासूनचे भाडे,मुनीम यांचा पगार,लाईट बिल तर काहींनी बँकांचे घेतलेले कर्जाचे हप्ते फेडू शकत नाहीत. यामुळे आता व्यापा-यांना लॉकडाऊन बंधनकारककिंवा जबरदस्तीचे करू नये अन्यथा व्यापा-यांना शेतक-यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येणार असल्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचे काही व्यापा-यांनी बोलून दाखविले.

सोन्या-चांदीचे व्यापारी ,मंगल कार्यालय ,सिमेंट -सळई व्यापारी ,कापड दुकान ,रेडिमेट स्टोअर्स ,जनरल स्टोअर्स ,हॉटेल ,लॉंिजग-बोर्डिंग ,टीव्ही -फ्रीज दुकाने, ऑटोमोबाईल्स ,मोबाईल दुकाने ,देशी दारू दुकाने ,परमिट रूम ,धाबे वाले ,पान टपरी,केशकर्तनालय, टेलर, सोनारलाईन ,दुचाकीची दुकाने ,सायकल दुकान ,आदींसह अनेक व्यापा-यांच्या व्यवसायांना कोरोना लॉक डाऊनमुळे फार मोठा फटका बसलेला आहे. या व्यापा-यांचे सहा महिन्यापासून दुकाने चक्क बंद असल्यामुळे लाखो रुपयांचे भाडे तसेच अनेक मुनिमांचा लाखांच्यावर पगारी देणे आहेत .लाईटचे भरमसाठ बिल भरावयाचे आहे ,अनेक व्यापा-यांनी व्यापार चांगला चालावा यासाठी बँकांचे कर्ज घेऊन दुकानात माल भरलेला आहे. सहा महिन्यांपासून व्यापार बंद असल्यामुळे व्यापा-यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. आता कुठेतरी या सर्व गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे.

सध्या शासनाने मेडिकल ,किराणा ,बँका ,एटीएम, कृषी दुकाने ही महत्त्वाची असलेली सेवा सुरू ठेवली आहे. लॉकडाऊन करूनही दररोजच्या सारखी गर्दी रस्त्यावर होत असल्यामुळे आजार वाढत आहे. त्यामुळे व्यापा-यांच्या मनावर दुकाने उघडायचे असतील तर उघडू द्यावे व्हायची तेवढीच गर्दी होत आहे. व्यापा-यांचे होणारे फार मोठे नुकसान यामुळे टाळता येणार आहे व शासनालाही जीएसटीचा फायदा मिळू शकणार आहे.व्यापा-यांना जबरदस्ती न करता त्यांच्या मनावर सोडावे. त्यांना ही भीती आहेच.ज्या व्यापा-याचे वय जास्त असेल असे व्यापारी कदाचित आपली दुकाने उघडणारही नाहीत.

जिल्हाधिकारी यांनी लोकांची खूप काळजी घेतली तरीही पण ऑगस्टमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा खूप वाढत आहे. यामुळे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी व्यापा-यांचे होणारे नुकसान टाळणे आता गरजेचे झाले आहे. व्यापा-यांनी आपल्या अडचणीतून क्षमतेपेक्षा जास्त भांडवल गुंतविलेले आहे . लॉकडाऊनमुळे ते सहा महिन्यांपासून खूपच त्रस्त व अडचणीत सापडले असून त्यांची झोप उडाली आहे. यापुढे व्यापा-यांना लॉकडाऊन बंधनकारककिंवा जबरदस्तीचे न करता त्यांच्या मनावर सोडणे त्यांच्यासाठी फारच आवश्यक झाले आहे.अन्यथा सर्व व्यापा-यांचे पंचनामे करून सहा महिन्यांचा त्यांचा सर्व खर्च देणार असल्यास त्यांना लॉकडाउन खूप कडक व जबरदस्तीचे करायला हरकत नसावी अशी व्यापा-यांमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे

देशात ५३ हजार नव्या रुग्णांची भर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या