22.1 C
Latur
Sunday, August 14, 2022
Homeलातूरमहात्मा बसवेश्वर चौकात वाहतूक कोंडी

महात्मा बसवेश्वर चौकात वाहतूक कोंडी

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
येथील रिंग रोडवरील महात्मा बसवेश्वर चौकात नेहमीच वाहतूक कोंडी होत आहे. रिंग रोडवरुन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु असल्याने वारंवार वाहतूक कोडीला सामोरे जावे लागत असल्याने वाहनधारक वैतागले आहेत. सध्या रिंग रोडच्या एकपदरी मार्गावरुन वाहतूक सुरु आहे.

रिंग रोडवरील बाभळगाव नाका स्व. दगडोजीराव देशमुख चौक ते महात्मा बसवेश्वर चौक या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. त्यामुळे रिंग रोडवरील एका बाजूची वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहने एकाच बाजूच्या रस्त्यावरुन सोडण्यात आली आहेत. परिणामी हा रस्ता वाहनांसाठी कमी पडत असल्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. विशेषत: सकाळी व सायंकाळी वाहनांची संख्या वाढत असल्यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात परंतू, वाहनांची संख्या आणि एकाच बाजूचा रस्ता यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी दोन-दोन तास लागतात. त्यामुळे वाहनधारक वैतागले आहेत.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे रिंग रोडवरील एकाच बाजुने वाहतुक सुरु आहे. त्यामुळे नांदेडकडून येणारी वाहने आणि राजीव गांधी चौकाकडून येणारी वाहने समोरासमोर येतात. वाहतूकीसाठी ३० ते ४० फु टाचा एक पदरी मार्ग आहे. त्यातच महात्मा बसवेश्वर चौकाचा परिसर हा ट्रक टर्निन्ससारखा आहे. या परिसरात मालवाहूक करणारे मोठे ट्रकस् नेहमी उभ्या असतात. एक पदरी वाहतूक आणि याच एकपदरी रस्त्याच्या कडेला ट्रक उभ्या असतात. त्यामुळे पुन्हा एकपदरी मार्गाचा बराचसा भाग उभ्या ट्रकमुळे व्यापला जातो. वाहतूकीसाठी खुप कमी रस्ता मिळतो.

त्यामुळेही वाहतूक कोंडीत भर पडते. खरे तर रिंग रोड आता रिंग रोड राहिलाच नाही. रिंग रोड आता शहराचा मुख्य रस्ता होत चालला आहे. रिंग रोडवरुन आता शहरातील बरीच वाहने असतात. त्यातच नागरिक, शाळा, महाविद्यालयीन मुला, मुलींसाठी येण्या-जाण्याचा रस्ताही हाच असल्यामुळे मुळे या रस्त्यावरुन वाहनांसह नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच या परिसरात बाजार पेठ, हॉटेल्स, विविध साहित्य विक्रीची दुकाने, बाजार समितीचे गुळ मार्केट, जनावरांचा बाजारही असल्यामुळे वाहनांची वर्दळ अधिक असते. रिंग रोडच्या उत्तर आणि दक्षीण दिशांना शहराचा मोठा विस्तार झालेला असल्यामुळेही रिंग रोडवर वर्दळ वाढली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या