21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeलातूरआष्टा येथे झाडे पडल्याने वाहतूक ठप्प

आष्टा येथे झाडे पडल्याने वाहतूक ठप्प

एकमत ऑनलाईन

चाकूर : तालुक्यातील आष्टा येथे रविवारी दि. १८ जुलै रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास वादळी वा-यासह जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे, शेड, वा-याने उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लातूर-उदगीर रोडवरील रोडलगतचे बाभळीचे झाड कोसळून पडल्याने उदगीर-लातूर जाणारी वाहतूक काही कालावधीसाठी ठप्प झाली होती.आष्टामोडहून घरणी ते नळेगाव दरम्यानच्या उदगीरकडे जाणा-या रोडने उडगीरकडे वाहने जात होती तर नळेगाव-घरणी मार्गे आष्टा मोडहून लातूर व रेणापूरकडे वाहने जात होती. आष्टा गावचे पोलिस पाटील सूर्यकांत पाटील यांनी तसहीलदार शिवानंद बिडवे, बांधकाम विभागाचे उपअभियंता लोखंडे यांच्याशी संपर्क साधून सदरील पावसाच्या स्थितीची माहिती दिली. तहसीलदार बिडवे यांच्या मार्गदर्शनखाली ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील झाड बाजूला करण्यात आले. यानंतर वाहतूक सुरळीत झाली, अशी माहिती पोलिस पाटील सूर्यकांत पाटील यांनी एकमतच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

जोरदार सुटलेल्या वादळीवा-यामुळे व पावसाच्या जोरदार सरीमुळे काही ठिकाणी शेतातील विद्युत पोल तारांसह कोसळून खाली पडले होते.त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. आष्टा गावातील जि.पक़ेंद्रीय प्राथमिक शाळेतील १ झाड मोडून संरक्षण भितीवर पडल्याने मोठे नुकसान झाले आहे. तसेच पसिरातील उसाच्या शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी ऊस आडवा पडला आहे. अन्य पिकांचे ही नुकसान झाल्याचे दिसून आले. पावसामुळे उद्भवलेल्या स्थितीमुळे ग्रामस्थ एकमेकांना सहकार्य करीत आहेत. अशीही माहिती पोलिस पाटील सूर्यकांत पाटील यांनी दिली.

पावसाचा इशारा लक्षात घेऊन मुंबईतील यंत्रणांनी अधिक सावधगिरी बाळगावी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या