23.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeलातूरजळकोट येथील मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहाचे हस्तांतरण रखडले

जळकोट येथील मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहाचे हस्तांतरण रखडले

एकमत ऑनलाईन

जळकोट : उदगीर-जळकोट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी जळकोट येथे मागासवर्गीय मुलींच्या वस्तीगृहाच्या इमारत बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता. या वस्तीगृहाचे काम पूर्ण होऊन जवळपास दोन वर्ष होत आहेत असे असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने समाज कल्याण विभागाकडे ही इमारत हस्तांतरित न केल्यामुळे ही कोट्यवधी रुपयाची इमारत शोभेची वस्तू बनली आहे.

जळकोट येथे शासकीय मागासवर्गीय मुलींसाठी वस्तीगृह मंजूर झाले होते. यानंतर स्वतंत्र इमारत नसल्यामुळे मुलींना राहण्याची सोय व्हावी यासाठी एका भाड्याच्या इमारतीमध्ये हे वस्तीगृह गत अनेक वर्षांपासून सुरूआहे. यानंतर मुलीची होणारे गैरसोय लक्षात घेऊन उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे तत्कालीन आमदार सुधाकर भालेराव यांनी जळकोट येथील वस्तीगृह इमारतीच्या बांधकामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून आणला होता. यानंतर या वस्तीगृहाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरूकरण्यात आले. जवळपास या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षाचा कालावधी लोटला आहे . गतवर्षी कोरोना महामारी मध्ये प्रशासनाने ही मागासवर्गीय मुलीच्या वस्तीगृहाची इमारत ताब्यात घेऊन , या ठिकाणी तालुकास्तरीय कोविड सेंटर सुरू केले होते.

याच ठिकाणी अनेक कोरोना रुग्णांनी उपचार घेतले . यानंतर कोरोनाची परिस्थिती निवळल्यामुळे या ठिकाणी सध्या कोविड सेंटर नाही. गतवर्षीच म्हणजे २०२१ मध्ये प्रशासनाने या ठिकाणचे कोविड केअर सेंटर बंद केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ समाज कल्याण विभागाकडे ही इमारत हस्तांतरित करणे गरजेचे होते परंतु ही इमारत समाजकल्याण विभागाकडे हस्तांतरित न केल्यामुळे अद्यापही इमारतीचे बांधकाम होऊनही मागासवर्गीय मुलींना भाड्यााच्या इमारतीमध्ये राहावे लागत आहे. या टोलेजंग इमारतीचा काहीच उपयोग होताना दिसून येत नाही . यामुळे या इमारतीचे तात्काळ हस्तांतरण करावे अशी मागणी होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या