34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeलातूरकुंचल्यातून यशवंत विद्यालय ते अयोध्या प्रवास

कुंचल्यातून यशवंत विद्यालय ते अयोध्या प्रवास

एकमत ऑनलाईन

अहमदपूर : दि. २५ फेब्रुवारी ते ७ मार्च या कालावधीत फॉर एवर लॉन फैजाबाद, आयोध्या (उत्तर प्रदेश ) येथे होणा-या ‘आयोध्या कला महोत्सव २०२१’ या ११ दिवसीय चित्र प्रदर्शनात यशवंत विद्यालय अहमदपूर येथील इयत्ता ९ वी ची विद्यार्र्थंीनी कु.अरुंंधती महारुद्र फुलारी हिच्या चित्राची निवड झाली आहे.

कु.अरुधती फुलारी हिचा यापूर्वी कला उत्सव २०२० मधील चित्रकला स्पर्धेत यश संपादन करुन शिव जयंती निमित्त घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेतून द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळविले होते. मतदार जनजागृती पोस्टर चित्र,तंबाखूमुक्त शाळा अभिमान पोस्टर चित्र अशा अनेक स्पर्धेत यश प्राप्त करुन आपल्या कुंचल्यातून आता थेट अहमदपूर ते आयोध्या पर्यंत चित्रकलेच्या माध्यमातून यश संपादन करणारी यशवंत विद्यालयातील ही पहिली विद्यार्र्थंीनी आहे. सध्या ती कुटुंबासोबत आयोध्येत पोहचली आहे.

या प्रदर्शनाचे उदघाटक प्रसिद्ध शिल्पकार, चित्रकार अनेक नामवंत कलाकारांच्या हस्ते होणार आहे. कु.अरुंधतीने आयोध्येत तयार होणा-या राम मंदिरचे चित्र आपल्या कुंचल्यातून साकारुन या महोत्सवात स्थान मिळविले आहे.कला शिक्षक महादेव खळुरे यांच्या मार्गदर्शन लाभले आहे.

या यशाबद्दल तिचे डायटचे प्राचार्य अनिल मुरकुटे, माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर मोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भगवान फुलारी, शिक्षणविस्ताराधिकारी नानासाहेब बिडवे, संस्थेचे सचिव श्क्षििण महर्षी डी.बी. लोहारे,मुख्याध्यापक बालाजी बिरादार, उपमुख्याध्यापक प्रेमचंद डांगे, पर्यवेक्षक रमाकांत कोंडलवाडे, उमाकांत नरडेले शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी आभिनंदन व कौतुक केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ५ पर्यंत राहणार संचारबंदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या