18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeलातूरपायी प्रवास करत केली अयोध्या यात्रा

पायी प्रवास करत केली अयोध्या यात्रा

एकमत ऑनलाईन

जळकोट : ओमकार सोनटक्के
चेरा येथील एका ध्येयवेड्या तरुणाने तब्बल एक महिना २४ दिवस पायी प्रवास करत १ हजार ३२५ किलोमीटर प्रवास करत अयोध्या यात्रा केली आहे. नारायण किशनराव बर्मे यांना पायी यात्रा करण्याचा छंदच आहे. अयोध्या राममंदिर दर्शन पायी जाण्याचा निश्चय केला. पदयात्रेत एकच ड्रेस, टॉवेल, पाणी बाटली, तांब्या, घोंगडी, छोटी बॅग, पदयात्रा फलक…अन् २ हजार ८०० रुपये घेतले. ते सांगतात महाराष्ट्रात सहा रुपये, एमपीमध्ये पाच, युपीमध्ये २५ रुपये असे तेथे जायीपर्यंत केवळ ३६ रुपये खर्च झाले. १९ ऑगष्ट ते १५ आक्टोबर २०२२ असा एक महिना २४ दिवसाचा प्रवास झाला.

चेरा-जांब-नांदेड-यवतमाळ-वर्धा-नागपूर-शिवणी-एम.पी. जबलपूर-नर्मदा नदी-सतनाग-महेर(शारदामाता)-जंगल २९ किलोमिटर-गुप्त गोदावरी-सती अनुसया (मध्यप्रदेश समाप्त)- चित्रकूट धाम (उत्तरप्रदेश सुरु) (पर्वत परिक्रमा केली)-करवी जिल्हा-कुन्हीया यमुना नदी, कोखराज, शिवमंदिर (गंगा नदी), श्रृगेरपूर, बिहार गाव, प्रतापगड- सुलतानपूर- नंदीग्राम (भरतजकुंड)- फैजाबाद जिल्हा-अयोध्या असा प्रवास केला. २००५ पासून दाढी राखली, अयोध्येत काढली, मंदिर झाले तर पायी येतो असे ठरवले होते. परत येताना रेल्वेने नेपाळमध्ये जानकीमाता जबलपूर करत प्रवास केला. ग्रामपंचायत, पोलिस पाटील, पोलिस ठाणे, तहसीलदार, माजी राज्यमंत्री संजय बनसोडे यांचे पत्र, आधारकार्ड सोबत होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या