30.6 C
Latur
Friday, May 14, 2021
Homeलातूरबीएसएनएलकडून पुन्हा वृक्षतोड

बीएसएनएलकडून पुन्हा वृक्षतोड

एकमत ऑनलाईन

लातूर : येथील टेलिफोन भवनमधील तीन मोठी झाडे बीएसएनएल व महावितरण या दोन विभागाच्या सहकार्याने रविवार दि. १२ जुलै रोजी तोडण्यात आली होती. त्यानंतर जवळपास दिड महिन्यात दुस-यांदा म्हणजेच रविवार दि. २३ ऑगस्ट रोजी पुन्हा मोठी झाडे बुडापासून साफ करण्यात आली.

येथील टेलिफोन भवनमधील झाडांवर बीएसएनएल व महावितरणच्या संयुक्त विद्यमाने पुन्हा एकदा कु-हाड चालविण्यात आली आहे. जेसीबी, कटर मशीन, ट्रक, टेम्पो, आवश्यक मनुष्यबळ आणि सकाळी ११.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत संपुर्ण परिसरात विद्यूत पुरवठा बंद करुन टेलिफोन भवनमधील मोठी झाडे बुडापासून तोडण्यात आली. झाडांचे मोठे बुड, फांद्या चक्क मोठ्या ट्रकमध्ये भरुन नेण्यात आली. टेलिफोन भवनच्या परिसरात गेल्या अनेक वर्षांपासूची ही झाडे आहेत. त्याा निलगीरी, सुबाभूळ, इंग्रजी चिंच, इतर काटेरी झाडांचा समावेश आहे. झाडांमुळे टेलिफोन भवनचा परिसरात हिरवागार आहे.

या भवनच्या प्रवेशद्वारावरच महावितरणचे ट्रान्सफार्मर आहे. झाडे मात्र टेलिफोन भवनच्या कंपाऊंडच्या आत आहेत. या ट्रान्सफार्मरवरुन उच्चदाब वीज वाहिनी गेलेली आहे. टेलिफोन भवनच्या आतील झाडांच्या काही फांद्या या उच्चदाव वीज वाहिनीच्या तारांना स्पर्ष करीत होत्या हेही खरे आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. वारा, वादळ सुटत आहे. कधी मोठा पाऊस आणि वादळ येईल आणि या झाडांच्या फांद्यांमुळे उच्चदाव वीज वाहिन्यांच्या तारांना अडथळा निर्माण होईल, हे सांगता येत नाही. हे जरी खरे असले तरी तारांना स्पर्ष करणा-या फांद्या तोडण्याऐवजी झाडे बुडापासून तोडण्यात आली. पर्यावरणाच्या संवर्धासाठी एकीकडे वृक्षारोपन मोठ्या प्रमाणात केले जात असताना दुसरीकडे मोठी  झाडे बुडापासून तोडण्यात आली.

रविवार गाठूनच वृक्ष तोड ४बीएसएनएलने टेलिफोन भवन परिसरातील मोठी झाडे दि. १२ जुलै रोजी तोडली होती. तो दिवस रविवारचाच होता आणि रविवारीच दि. २३ ऑगस्ट रोजीही झाडे तोडण्यात आली. हा योगायोग म्हणावा की, रविवार हा सुटीचा दिवसच वृक्ष तोडीसाठी बीएसएनएल व महावितरणला योग्य वाटते?

वृक्षतोडीची चौकशी व्हावी
बीएसएनएलने महावितरणच्या सहकार्याने टेलिफोन भवन परिसरातील मोठी झाडे तोडली. त्यास परवानगी होती काय? परवानगी दिली गेली असेल ती कोणत्या निकषावर दिली गेली याची चौकशी झाली पाहिजे, असे ग्रीन लातूर वृक्ष टिमचे डॉ. पवन लड्डा यांनी ‘एकमत’शी बोलताना सांगीतले. अडथळा होतो म्हणुन झाडे तोडणे योग्य नाही. अगदीच नाईलाज असेल तर तोडा पण त्या मोबदल्यात दहा झाडे लावून त्याच्या संगोपणाची जबाबदारी घ्या, असेही डॉ. लड्डा म्हणाले.

फिरत्या हौदात किंवा घरीच बाप्पाचे विसर्जन करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,495FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या