27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeलातूरझाडे हेच पावसाचे एटीएम कार्ड

झाडे हेच पावसाचे एटीएम कार्ड

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
स्वत:चे करुन दुस-याचे करणे म्हणजे जीवन. आपले काम आपणच केले पाहिजे. समाज तोच आहे लोकांचा फायदा करणारा पुढारी त्यांना मिळाला नाही. पैसे घेऊन मतदान करणे अतिशय पाप आहे. गोदान, मतदान आणि कन्यादान ही पवित्र दान आहेत. तसेच पर्यावरण संवर्धन हेही पवित्र कार्य आहे. ख-या अर्थाने झाडे हेच पावसाचे एटीएम कार्ड आहे, असे मत पाटोदा जिल्हा औरंगाबाद येथील राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले.

कावेरी बहुउद्देशीय विकास संस्था, साखरा तालुका लातूर या संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी पेरे पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी लाइफ केअर सेंटर लातूरचे डॉ. गिरीष गोपीनाथ मस्के पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक सचिव साने गुरुजी शैक्षणिक संकुल लातूरचे कालिदास माने, प्रशासकीय अधिकारी व्ही. के. माने, सरपंच सारिका मोटे, उपसरपंच तुकाराम गोडसे पाटील विचार मंचावर उपस्थित होते.

पुढे बोलताना पेरे-पाटील म्हणाले, सगळ्या आजाराचे मूळ पाण्यात आहे. म्हणून देशाचा विचार करण्यापेक्षा गावाचा विचार करा. माणसं आयुष्यात एक झाड लावत नाहीत पण जाताना चारकिं्वटल सरपन घेऊन जातात. म्हणून प्रत्येकाने एक झाड लावणे ही काळाची गरज आहे. ख-या अर्थाने झाडे पावसाचे एटीएम आहेत, झाडे लावली तरच पाऊस पडेल.

प्रारंभी बालाजी नरारे सहशिक्षक संगीत विभाग करमाळा यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉ. सुरेशकुमार कांबळे यांनी तर सूत्रसंचालन व आभार डॉ. दुष्यंत कटारे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. मा. ना. गायकवाड, संस्थेच्या अध्यक्ष रेखा नारायण कलमे, उपाध्यक्ष स्वाती सुरेशकुमार कांबळे, सुदाम राम कांबळे, बालाजी अंकुश साळवे, सचिन जीवन सरवदे, प्रणव कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला साखरा आणि पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या