निलंगा : प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील तांबाळा येथील श्री षण्मुखेश्वर विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनी कु सृष्टी कालिदास मुळे व वैष्णवी दयानंद बिराजदार यांनी श्री श्री रविशंकर विद्यालय लातूर येथे आयोजित ५० व्या जिल्हा स्तरीय विज्ञान प्रदर्शनात गाजर गवतापासून जैविक किटकनाशक हा प्रयोग सादर केला व या प्रयोगाने जिल्ह्यातून माध्यमिक गटात प्रथम क्रमांक पटकावला. यामुळे प्रसिद्ध सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांच्या हस्ते प्रयोग सादर केलेल्या विद्यार्थिनींचा व मार्गदर्शकांचा पदक, प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व उपयुक्त विज्ञान साहित्य देवून सन्मान करण्यात आला.
या विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक साहू एस के, कारवडे आर बी व गायकवाड एस यू यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी विभागीय शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मापारी, उपशिक्षणाधिकारी सौ अंधारे आदी मान्यवर उपस्थित होते. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबुराव इंडे, उपाध्यक्ष शिवराज दरेकर, सचिव पृथ्वीराज मुळे, मुख्याध्यापक एस. एम. उडबळे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी कौतुक केले.