34.3 C
Latur
Tuesday, April 13, 2021
Homeलातूरविकासरत्न विलासराव देशमुख यांना आदरांजली

विकासरत्न विलासराव देशमुख यांना आदरांजली

एकमत ऑनलाईन

विलासनगर : विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या ८ व्या स्मृतिदिना निमित्त येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथील स्मृतिस्थळी माजी मंत्री तथा चेअरमन दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी व्हाईस चेअरमन श्रीशैल उटगे, रेणा सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन आबासाहेब पाटील, जागृती शुगरचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण मोरे, संचालक अशोक काळे, तात्यासाहेब देशमुख, वसंत उफाडे, बंकट कदम, सदाशिव कदम, अनिल दरकसे, सूर्यकांत पाटील, सचिन शिंदे, निळकंठ बचाटे (पवार), धनराज दाताळ, ज्ञानेश्वर पवार, कैलाश
पाटील, नवनाथ काळे, शेरखॉ पठाण, शंकर बोळंगे, बाबुराव जाधव, तज्ज्ञ संचालक महेंद्रनाथ भादेकर, ज्ञानेश्वर भिसे कार्यकारी संचालक जितेंद्र रनवरे, खाते प्रमुख व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

विलासराव देशमुख यांना लातूर अर्बन बँकेतर्फे श्रद्धांजली
लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त येथील लातूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत विकासरत्न विलासराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बँकेच्या संचालक मंडळाच्या मासिक मिटींग बॅँकेचे संस्थापक अध्यक्ष प्रदीप राठी यांच्या अध्यक्षतेखाली व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात आली. या मिटींगमध्ये विकासरत्न विलासराव देशमुख यांना बँकेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पुण्यात सार्वजनिक गणेश विसर्जनाला परवानगी नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या