24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeलातूरआजपासून हर घर तिरंगा

आजपासून हर घर तिरंगा

एकमत ऑनलाईन

लातूर : प्रतिनिधी
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि. १३ ऑगस्ट पासून हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हयातील सर्व पंचायत समिती व त्यातंर्गत कार्यालये, ग्रामपंचायतीच्या मुख्यालयात सकाळी ८.३० पूर्वी लोक प्रतिनिधीच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्याच्या सुचना लातूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी पंचायत समिती व ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.

हर घर तिरंगा मोहीम अंतर्गत दि. १३ व १४ ऑगस्ट रोजीचे ध्वजारोहण सकाळी ८.३० पूर्वी करण्यात यावे. राष्ट्रध्वजाला वंदन करताना राष्ट्रगीत वाजविण्यात यावे. सलामीच्या वेळी सज्ज असलेला बॅण्ड सलामीपूर्वी व सलामीनंतर वाजवावा. यावेळी करण्यात येणा-या भाषणांचा विषय हा स्वातंत्र्य दिनाचे महत्व विषद करणारा, देशाची एकता व अखंडता अबाधित ठेवण्यासाठी कार्य करण्यासाठी प्रेरित करणारा असावा. पंचायत समिती मध्ये प्रशासक तथा गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत मुख्यालयात सरपंच किंवा गाव प्रमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात यावे. तसेच दिवसभरात वृक्षारोपण, आंतर शालेय, आंतर महाविद्यालय यांच्या स्तरावर ऑनलाईन वाद-विवाद स्पर्धा, प्रश्न मंजुषा, देशभक्तीपर निबंध, कविता स्पर्धाचे आयोजन करण्यात यावे. सोशल मिडियाव्दारे निवडक विद्यार्थी, विध्यार्थिनीचे देशभक्तीपर गाणे, भाषणे आयोजित करावीत. शासकीय इमारतीवर विद्युत रोषणाई करावी, अशा सुचनाही देण्यात आल्या आहेत. जिल्यातील सर्व सार्वजनिक व शासकीय इमारतीवर राष्ट्रध्वज उभारण्यात यावा. ध्वजारोहणाच्या समारंभासाठी खासदार, आमदार, माजी जिल्हा परिषद सदस्य, स्वातंत्र्य सैनिक, शहीद जवानांच्या पत्नींना व आई-वडिलांना आदींना निमंत्रित करण्यात यावे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या